पिंपळे गुरव: प्रतिनिधी!
(ppcnews.in)
लोकनेते आमदार स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या ६२व्या जयंतीनिमित्त ‘अटल विनामूल्य महाआरोग्य शिबिर’ आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात सहभागी झालेल्या २५० दिव्यांग बांधव व ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक असलेल्या विविध प्रकारच्या ७९७ सहाय्यक उपकरणांचे वाटप महाराष्ट्र राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व नगर विकास राज्यमंत्री मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले.
ज्यामध्ये मोटराईज ट्राय सायकल, चालण्याची काठी (उंची कमी आस्त होणारी), चालण्याची काठी (उंची फिक्स, कोपर काठी (डेची फिक्नर), अल्युमिनिअम कुबड्या, चार पायाची काठी, कमोड चेअर, तीन पायाची काठी, व्हील चेअर, गुडघ्याचा पट्टा, अत्याधुनिक कृत्रिम पाय, श्रवण यंत्र, चाकाची घडीची खुर्ची, कमोड व्हील चेअर, तीन पायाची काठी, बुटातील कुशन, संपूर्ण पाठीचा पट्टा, कृत्रिम हात, मानेचा पट्टा, पाठीचा पट्टा, सी.पी.चेअर, ट्राय सायकल, स्मार्ट फोन, सुगम्य केन, गुडघ्याचा पट्टा याचबरोबर सर्व अत्याधुनिक प्रकारचे साहित्य वाटप करण्यात आले.

या उपक्रमाचे आयोजन महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका, प्रतिभा महिला प्रतिष्ठान, चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि अटल चॅरिटेबल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. तसेच, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (ALIMCO) मुंबई व लक्ष्य फाउंडेशन म.रा. यांच्या सहकार्याने दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव देण्यात आले.
दिव्यांग बांधव आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी उपयोगी ठरणाऱ्या उपकरणांचे वाटप हे त्यांच्या आत्मविश्वासाला बळ देणारी गोष्ट असून समाजातील प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने आणि सुलभतेने जगता यावं, यासाठी असे उपक्रम खूप महत्त्वाचे ठरतात. मला विश्वास आहे की, लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या जयंतीच्या निमित्ताने केलेली मदत दिव्यांग बांधव व ज्येष्ठ नागरिकांच्या रोजच्या जीवनात सकारात्मक बदल घडवेल.
यावेळी मा. महापौर उषा उर्फ माई ढोरे, मा. सभागृह नेते श्री. नामदेव ढाके, प्रदेश सदस्य श्री. संतोष कलाटे, शहराध्यक्ष श्री.शत्रुघ्न काटे, नियोजन समिती सदस्य पुणे जिल्हा सौ.भारतीताई विनोदे, मा. नगरसेवक श्री. शशिकांत कदम, श्री. विनायक गायकवाड, श्री.शितल शिंदे, श्री. सागर आंघोळकर, श्री. बाबा त्रिभुवन, श्री. राजेंद्र गावडे, श्री. संतोष कांबळे, श्री. सुरेश भोईर, स्वीकृत सदस्य श्री. महेश जगताप, श्री. संदीप गाडे, श्री. विठ्ठल भोईर, मा. नगरसेविका सौ.उषाताई मुंडे, सौ.वैशालीताई जवळकर, सौ.आरतीताई चोंधे, सौ.निर्मलाताई कुटे, सौ.सुजाताताई पलांडे, सौ.शारदाताई सोनवणे, सौ.संगीताताई भोंडवे, सौ.मनीषाताई पवार, सौ.ज्योतीताई भारती, श्री. गणेश कस्पटे, तहसीलदार श्री.जयराज देशमुख, निवडणूक प्रमुख श्री. काळूराम बारणे, श्री. शेखर चिंचवडे, श्री. नितीन इंगवले, श्री. राहुल जवळकर, सौ.पल्लवीताई मारकड, श्री. प्रमोद पवार, सौ.कविताताई दळवी, श्री. प्रसाद कस्पटे,श्री. सुधीर साळुंखे, श्री. अमर आदियाल, श्री. शशिकांत दुधारे, , श्री. नरेश खुळे, श्री. माऊलीशेठ जगताप, डॉ. शेलार, श्री. नागनाथ एमपल्ले, मंडलाध्यक्ष श्री. सोमनाथ तापकीर, श्री. गणेश ढोरे, श्री. हर्षल नढे, श्री. सनी बारणे, श्री. मोहन राऊत, कुंदाताई भिसे, सौ.पल्लवीताई जगताप, सौ.कावेरीताई जगताप, सौ.शोभाताई जांभुळकर, सौ.दुर्गाताई आदियाल, श्री. दीपक भोंडवे, श्री. सचिन राऊत, श्री.सचिन शिवले, श्री.वाल्मिक शिवले, श्री. जवाहर ढोरे, श्री. कपिल कुंजीर, श्री. मिलिंद कंक, श्री. सुनील देवकर, श्री. उमेश सांडभोर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.



















































