पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रावेत येथील जलउपसा केंद्रातील टप्पा क्र . २ च्या उच्च दाबनलिकेतून पाण्याची गळती होत आहे. सदर गळतीची दुरुस्ती करणेकामी गुरुवार दि. ११/०६/२०२० रोजी सकाळी १०.०० नंतर टप्पा क्र. २ च्या उच्च दाबनलिकेचे पंपिंग बंद ठेवण्यात येणार आहे.
त्यामुळे चिंचवड, बिजलीनगर, पिंपरीनगर, पिंपरीगाव, जुनी सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, दापोडी इ. भागातील त्या दिवसाचा संध्याकाळचा पाणीपुरवठा उशिराने, कमी दाबाने व विस्कळीत होईल.
सदरच्या गळतीची दुरुस्ती लवकरात लवकर करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा विभागाचा प्रयत्न राहील. तरी, नागरिकांनी उपलब्ध पाणी जपून वापरा, असे आवाहन महानगरपलिकच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.





















































