*>* शासन दरबारी डिजिटल मीडिया अधिकृत नोंदणीसाठी प्रयत्न करणार – जाधव
*पिंपरी I झुंज न्यूज :* मराठी पत्रकार परिषद संलग्न पिंपरी-चिंचवड डिजिटल मिडिया पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी महावीर जाधव यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
मराठी पत्रकार परिषद मुख्य विश्वस्त एस एम देशमुख सर, विश्वस्त किरण नाईक, राज्य अध्यक्ष शरद पाबळे यांच्या आदेशावरून विभागीय सचिव गणेशजी मोकाशी व पिंपरी-चिंचवड पत्रकार संघ अध्यक्ष अनिल वडघुले यांच्या मार्गदर्शनाखाली हि निवड करण्यात आली.
डिजिटल मिडिया संघ अध्यक्ष पदी निवडीनंतर महावीर जाधव यांचा सत्कार आण्णा साहेब मगर बँकेचे संस्थापक बाळासाहेब गव्हाणे, एमपीसी न्युज चॅनेल चे जेष्ठ पत्रकार अनिल कातळे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी संघाचे उपाध्यक्ष सुरज साळवे, पराग डिंगणकर, राजकुमार शेडगे, संतोष गोतावळे, सिद्धांत चौधरी, कार्याध्यक्ष अविनाश आदक आदिंसह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
याप्रसंगी डिजिटल मिडिया अध्यक्ष पदाला न्याय देऊन डिजिटल पत्रकार, पोर्टल, ऑनलाईन चॅनेल, युट्यूब चॅनेल या सर्वांसाठी त्यांच्या तांत्रिक अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे तर शासन दरबारी प्रिंट मिडिया प्रमाणे सर्व सोई सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न तसेच अधिकृत नोंदणीकृत होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे महावीर जाधव यांनी सांगितले.