#TogetherWeCan
रोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात रक्तदानाचे आवाहन केले आहे. त्यापार्श्वभूमीवर पराग ढेणे मित्र परिवाराच्या वतीने आज वारजे माळवाडी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये ९२ रक्तदात्यांनी सहभाग घेतला त्यापैकी ८३ जणांनी रक्तदान केले तर ९ जणांना काही कारणाने रक्तदान करता आले नाही.
यावेळी पराग ढेणे म्हणाले की, आज सर्वांच्या सहकार्याने आयोजित केलेले रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या पार पडले. आम्ही मोठ्या संख्येने समाजासाठी रक्त पुरवठा करू शकलो याचा आनंद आणि समाधान दोन्ही आहे.
तर आपल्याला रक्तदानासाठी हॉस्पिटल उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ. पाटील यांचे विशेष आभार तसेच नवले हॉस्पिटलच्या सर्व टीम ने उपक्रम राबवला त्यांचे आभार आणि सर्व नियोजन चांगल्या पद्धतीने पार पाडले यासाठी माझे सहकारी मित्र केदार राऊत, ओंकार चव्हाण, विवेक पवळे आणि रवी जाधव यांचे आभार. रक्तदानासाठी परवानगी दिली यासाठी वारजे पोलिसांचे आभार. तसेच आपल्या भागातील लोकप्रतिनिधी सचिनभाऊ दोडके, भारतभूषण बराटे, बाबा धुमाळ, रमेश बाप्पु कोंडे या सर्वांनी उपक्रमात सहभागी होऊन प्रोत्साहन दिले, या सर्वांचे आभार. आणि सर्वात महत्त्वाचे उपक्रमात सहभागी रक्त दाते तसेच उपक्रमाला भेट देणारे सर्व मित्र वर्ग यांचे विशेष आभार.
आपण या उपक्रमात प्रत्येक रक्तदात्यास सॅनिटायजर आणि मास्क वाटप केले, यासाठी लागणाऱ्या एकूण रकमे पैकी काही रक्कम म्हणून आपण आपल्या मागील धान्य वाटपाची उर्वरित रक्कम इथे वापरली. सर्वांसाठी चहा, बिस्किटे विवेक पवळे यांनी उपलब्ध केले तसेच किरण माकर यांनी समोसे उपलब्ध केले आणि अर्चना पराग ढेणे यांनी पाणी बॉटल्स उपलब्ध केल्या, या सर्वांचे सहकार्यासाठी आभार मानतो. प्रत्येक रक्तदात्यास महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री. शिवाजी महाराज यांची प्रतिमा असलेली फ्रेम भेट म्हणून दिली.
आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण हे शिबीर मोठ्या प्रमाणात रक्तदान करत यशस्वी करू शकलो म्हणून पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो
या पुढील काळातही आम्ही समाजासाठी असेच नव-नवीन उपक्रम घेऊन समाजाच्या सेवेत हजर राहू.





















































