पुणे, दि. 12: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह (नवीन), येरवडा येथे अनु. जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी https://hmas.mahaait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे, अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन गृहपाल यांनी केले आहे.
या वसतिगृहामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकरिता भोजन, निवासाची व्यवस्था, पुस्तके, स्टेशनरी,इतर शैक्षणिक बाबींकरीता आर्थिक सहाय्य तसेच आदी सुविधा विनामूल्य पुरविण्यात येतात. प्रवेशित विद्यार्थ्यांना शासनाकडून मासिक निर्वाह भत्ता तसेच इतर अनुदान देण्यात येते. या वसतिगृहात कनिष्ठ माविद्यालयातील १० वी नंतर कनिष्ठ महाविद्यालय, तंत्रनिकेतन, शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्थो येथे मध्ये प्रवेश घेतलेल्या कुठल्याही शाखेच्या विद्यार्थ्यांस जात प्रवर्ग निहाय गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येतो. अधिक माहितीसाठी गृहपाल (भ्र. क्र. ९९२3509500) यांच्याशी संपर्क साधावा, असे परिपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.





















































