*पुणे : दिनांक : १५ मार्च २०२२* : नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ पर्सोनेल मॅनजमेंट अर्थात एनआयपीएमचा वर्धापनदिन एनआयपीएमच्या पुणे विभागाच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला.एनआयपीएमचे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांच्या हस्ते यावेळी एनआयपीएम परिवारातील पीएच.डी.चे मानकरी ठरलेल्या काही सदस्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.तसेच एनआयपीएम सदस्यांच्या कुटुंबातील पाल्यांचा त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना एनआयपीएमच्या पुणे विभागाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सांगितले की गेली दोन वर्षे कोरोना संकटामुळे एनआयपीएमचे कार्यक्रम ऑनलाईन स्वरूपातच होत होते, मात्र आता निर्बंध शिथिल करण्यात आल्याने यंदाचा संस्थेचा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्याचे ठरले.
यावेळी एनआयपीएम संस्थेतर्फे प्रकाशित केल्या जाणाऱ्या संशोधन ग्रंथाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यंदाच्या या संशोधन ग्रंथ आवृत्तीची मध्यवर्ती विषय संकल्पना‘प्रतिभा व्यवस्थापनाद्वारे आस्थापनेची वृद्धी सुनिश्चित करणे’ (Leveraging Talent Management to Ensure Organisation Growth) ही आहे. या संशोधन ग्रंथ मालिकेच्या उपक्रमाबादल यावेळी संपादक डॉ.एस.व्ही.भावे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
या संशोधन ग्रंथाच्या संपादकीय समितीतील सदस्यांचा तसेच एनआयपीएम संस्थेतील नवीन सदस्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाला एनआयपीएमच्या पुणे विभागाचे सचिव प्रकाश बिमलखेडकर यांच्यासह कार्यकारी समितीचे पदाधिकारी व एनआयपीएमचे सर्व सदस्य आपल्या कुटुंबीयांसमवेत उपस्थित होते. याप्रसंगी आयोजित संगीत रजनी कार्यक्रमातही उपस्थितांनी