प्रतिनिधी: अजय जाधव
पिंपरी चिंचवड: ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रमांक 25 येथील वाकड येथे सोमवारी दि. 22/3/2021 रोजी महानगरपालिकेचे बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम विभागाने ‘ड’ प्रभाग क्षेत्रीय अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली अनधिकृत पत्राशेडवर कारवाई केली. सदर कारवाईमध्ये ४४१२.०० चौ. फूट असलेले ०३ पत्राशेडवर कारवाई करण्यात आली.
सदर कारवाई ‘ड’ प्रभाग क्षेत्रीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता व स्थापत्य अभियांत्रिकी यांच्या पथकाने केली. सदर कारवाईस १९ पोलीस, ०३ जे.सी.बी, १ ट्रॅक्टर ब्रेकर, २ ट्रक, ०८ मजूर व १५ मनपा कर्मचारी यांच्या सहकार्याने करण्यात आली.





















































