पिपीसी न्यूज नेटवर्क
नवी सांगवी : प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक ३१ मधील अपक्ष उमेदवार पसरणीकर पायल अमित यांच्या पदयात्रा रॅलीला नवी सांगवी परिसरात उस्फूर्त आणि अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. ठिकठिकाणी नागरिकांनी फुलांची उधळण करत रॅलीचे जंगी स्वागत केले. महिलांनी औक्षण करून पसरणीकर पायल अमित यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

या भव्य पदयात्रेत महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक अशा सर्वच स्तरांतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ‘कप-बशी’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. नागरिकांचा वाढता उत्साह आणि प्रचंड पाठिंबा पाहून पसरणीकर दांपत्य भावूक झाले.
यावेळी बोलताना पसरणीकर पायल अमित म्हणाल्या, “नवी सांगवीकरांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मी नक्कीच सार्थ ठरवेन. प्रभागातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावणे आणि नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हेच माझे प्रमुख ध्येय आहे.”
स्थानिक रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, महिला-सुरक्षा आणि नागरी सुविधांवर विशेष लक्ष देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
या पदयात्रेच्या निमित्ताने नवी सांगवीतील नागरिकांनी एकमुखी निर्धार व्यक्त केला—
“यंदा आपलाच उमेदवार महापालिकेत पाठवायचा!”
एकूणच, या पदयात्रेमुळे पसरणीकर पायल यांच्या प्रचाराला नवे बळ मिळाले असून, प्रभाग ३१ मधील निवडणूक लढतीत रंगत अधिकच वाढली आहे.





















































