पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
ppcnews.in
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक ३१ (नवी सांगवी) – अनुसूचित जाती या प्रभागातून प्रा. सुनंदा सतीश काटे यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. शिक्षण, समाजसेवा आणि प्रशासकीय अनुभवाच्या जोरावर त्या मतदारांमध्ये विश्वासार्ह उमेदवार म्हणून ओळखल्या जात आहेत.
फर्ग्युसन कॉलेज, पुणे येथील वनस्पतीशास्त्र विभागाच्या निवृत्त विभागप्रमुख (Retd. Head of Botany Dept.) असलेल्या प्रा. सुनंदा काटे या गेल्या ३५ वर्षांपासून प्रभाग ३१ मधील नागरिकांच्या विश्वासास पात्र ठरल्या आहेत. १९९० पासून नवी सांगवी व पिंपळे गुरव परिसरात त्या सामाजिक कार्यात सक्रिय असून शिक्षण, महिला सक्षमीकरण, ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न, स्वच्छता, आरोग्य व नागरी सुविधांसाठी त्यांनी सातत्याने योगदान दिले आहे.

“अनुभवही… कामही…” या भूमिकेतून त्या निवडणूक रिंगणात उतरल्या असून,
शिक्षण व आरोग्य सुविधा मजबूत करणे
महिला सक्षमीकरण व स्वयंसहायता गटांना प्रोत्साहन
युवकांसाठी रोजगार व कौशल्य विकास
स्वच्छता, सुरक्षितता व नागरी सोयीसुविधा
ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष योजना
हे त्यांच्या प्रचाराचे मुख्य मुद्दे आहेत.
“प्रगतीचा मार्ग, विकासाचं वचन” देत, सुरक्षित व सेवा-प्रधान प्रभाग घडवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे. अनुभव, विश्वास आणि कार्यक्षमतेच्या जोरावर प्रभाग क्रमांक ३१ च्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
नागरिकांनी विकासाभिमुख, सुशिक्षित व अनुभवी नेतृत्वाला पाठिंबा द्यावा, असे आवाहनही प्रा. सुनंदा सतीश काटे यांनी केले आहे.




















































