पिंपरी | प्रतिनिधी:
ppcnews.in
सामाजिक क्षेत्रातील उच्चशिक्षण (MSW) आणि प्रत्यक्ष समाजकार्याचा प्रदीर्घ अनुभव असलेले श्री. मनोजकुमार मारकड हे प्रभाग क्रमांक ३१ (OBC – पुरुष) मधून एक सक्षम, अभ्यासू व जनतेशी नाळ जुळलेले उमेदवार म्हणून नागरिकांच्या विश्वासाचे केंद्रबिंदू ठरत आहेत.
भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या विशेष विश्वासातील उमेदवार म्हणून त्यांची ओळख अधिक भक्कम होत आहे.
अभ्यासू नेतृत्व, प्रभावी भाषणकौशल्य, दूरदृष्टी असलेले नियोजन, प्रशासकीय कामकाजाची तांत्रिक जाण आणि सर्वसामान्य नागरिकांशी असलेला थेट संवाद ही त्यांची ठळक वैशिष्ट्ये आहेत.
भाजपाच्या जिल्हा संयोजक – बुद्धिजीवी प्रकोष्ठ (पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा) या महत्त्वाच्या जबाबदारीत त्यांनी पक्षवाढीसाठी प्रभावी कामगिरी केली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत आमदार शंकरभाऊ जगताप यांनी वेळोवेळी सार्वजनिकपणे त्यांचे कौतुक केले आहे.
राज्य व केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात मनोजकुमार मारकड यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. लाडकी बहीण योजना, LIC विमा सखी योजना, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना यांसारख्या उपक्रमांमुळे महिलांपासून तरुणांपर्यंत अनेकांना त्यांनी सक्षम केले. विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन, युवकांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण आणि रोजगारनिर्मितीच्या उपक्रमांमुळे परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून त्यांनी सेवा वस्तीत सातत्याने सामाजिक कार्य केले आहे. अंतोदय — शेवटच्या घटकापर्यंत विकास या विचारधारेतून ते कार्यरत असून, गरजू, वंचित व दुर्लक्षित घटकांना न्याय देण्याची भूमिका त्यांनी कायम ठेवली आहे.
अहिल्यादेवी सेवा संघाचे २००९ पासूनचे पदाधिकारी म्हणून तसेच कार्याध्यक्ष या नात्याने त्यांनी धनगर समाजाचे संघटन अधिक बळकट केले. समाजाच्या हक्कांसाठी झालेल्या आंदोलने व उपोषणांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. या कार्याची दखल घेत, महाराजा यशवंतराव होळकर राज्याभिषेक सोहळा समितीवर त्यांची जिल्हा सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पद्मविभूषण समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग, राळेगणसिद्धी येथील कार्यशाळांमधील सक्रिय उपस्थिती आणि भ्रष्टाचारविरोधी लढ्यातील योगदान हे त्यांच्या प्रामाणिकतेचे उदाहरण आहे.
लोकप्रिय आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या विकासकार्याचे ‘विकासदूत’ म्हणून मनोजकुमार मारकड ओळखले जात असून, विविध समाजघटक, युवक, महिला व ज्येष्ठ नागरिक यांच्यात त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. सोलापूर जिल्हा व करमाळा तालुका मित्रपरिवाराच्या माध्यमातून त्यांनी शहरात सामाजिक ऐक्य निर्माण केले आहे.

प्रभाग ३१ च्या सर्वांगीण विकासासाठी, स्वच्छ, पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासनासाठी मनोजकुमार मारकड यांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत संधी मिळावी, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत असून, त्यांचा प्रचार वेगाने जोर धरताना दिसत आहे.
उत्तम खेळाडू म्हणूनही श्री. मनोजकुमार मारकड परिचित
परिसरात ओम साई क्रिकेट क्लबचे उत्तम खेळाडू म्हणूनही मनोजकुमार मारकड परिचित आहेत. उद्योग–व्यवसाय करणाऱ्या मित्रपरिवारासोबत ते नियमितपणे मैदानावर दैनंदिन सराव करतात. केवळ खेळापुरतेच मर्यादित न राहता, मैदानालाच सामाजिक जाणीवेचे केंद्र बनवत त्यांनी शिक्षक दिन, गुरुपौर्णिमा तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मान सोहळे आयोजित केले आहेत. या उपक्रमांमुळे युवकांमध्ये संस्कार, शिस्त व आदरभाव निर्माण होत आहे.
सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टीने त्यांनी स्वतःचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्याची वेगळी परंपरा सुरू केली आहे. वाढदिवसाच्या दिवशी परिसरातील सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम, स्वच्छता कर्मचारी व कष्टकरी बांधवांचा सन्मान, त्यांना खाऊ वाटप असे उपक्रम राबवून ते समाजाला सकारात्मक संदेश देत आहेत. या उपक्रमांचे नागरिकांकडून विशेष कौतुक केले जात आहे.
पत्नी तेजश्री मारकड यांचे
वंचित मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याचे मोलाचे कार्य
(१२th Sci, D.Ed.) या शिक्षिका असून, त्या गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांना अत्यल्प शुल्कात शिकवणी वर्ग घेतात. शिक्षणाच्या माध्यमातून वंचित मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याचे मोलाचे कार्य त्या सातत्याने करत आहेत.





















































