पिंपरी ;अजय जाधव(दि. ३० डिसेंबर २०२०) :- स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालविणाऱ्यास सामाजिक सुरक्षा पथकाने अटक केली असून, दुसऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. विनोद विश्वनाथ घाटोळकर (वय ३४, रा. जामा मस्जिद समोर, गोकुळधाम हाऊसिंग सोसायटी, पिंपरी) या स्पा सेंटरच्या मॅनेजरला अटक झाली आहे.
भरत पवार (वय २७, काळेवाडी, पुणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पिंपळे सौदागर येथील नाशिक फाटा रस्त्यावरील गणेशम इमारतीच्या पाचव्या मजल्यावर थाई स्पा चालविला जात होता.
येथे स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालविला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सामाजिक सुरक्षा पथकाने कारवाई करीत महिलांची सुटका केली. सांगवी पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.