पिपीसी न्यूज नेटवर्क
नवी सांगवी : प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ अंतर्गत प्रभाग क्रमांक ३१ – अनुसूचित जाती महिला (अ) प्रवर्ग या राखीव जागेतून प्रा. सुनंदा सतीश काटे या उच्चशिक्षित, अनुभवी आणि समाजकारणाशी दीर्घकाळ नाते असलेल्या महिला अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्यांना ‘कपाट’ हे निवडणूक चिन्ह बहाल करण्यात आले आहे.
प्रा. काटे या १९८६ पासून प्रभागात वास्तव्यास असून, परिसरातील सामाजिक, शैक्षणिक आणि नागरी प्रश्नांची त्यांना सखोल जाण आहे. शिक्षण, समाजकारण, राजकारण, अनुभव आणि कार्यपद्धती या सर्वच बाबींमध्ये त्या इतर उमेदवारांच्या तुलनेत सरस ठरत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.
प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना प्रा. काटे यांनी विविध विषयांवरील व्याख्यानांच्या माध्यमातून जनजागृती केली आहे. सामाजिक मूल्ये, महिला सक्षमीकरण, आरोग्य, शिक्षण आणि तंत्रज्ञान याबाबत त्यांनी सातत्याने मार्गदर्शन केले आहे.
तसेच हजारो नागरिकांसाठी योगा कार्यशाळांचे आयोजन करून आरोग्यविषयक जनजागृतीचा ध्यास त्यांनी जोपासला आहे.
राजकारणात प्रवेश करताना त्यांनी दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवातीपासून सक्रिय सहभाग घेतला. शासनाच्या विविध योजना, सुविधा व हक्कांची माहिती त्यांनी प्रत्यक्ष नागरिकांपर्यंत पोहोचवली असून, अनेकांना त्याचा लाभ मिळवून दिला आहे.
सध्याच्या काळात मोबाईलचा वाढता गैरवापर, विशेषतः लहान मुले व युवकांवर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मोबाईल वापराबाबत जनजागृती करण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले आहे.
“समाज शिकला पाहिजे ही तळमळ
समाज जागृत झाला पाहिजे ही तळमळ”

“निवडणूक निकाल काहीही असो, माझे समाजकारण थांबणार नाही. मनापासून आणि प्रामाणिकपणे समाजासाठी काम करत राहीन,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना प्रा. काटे म्हणाल्या,
आईचे निधन; विरह बाजूला ठेवत समाजसेवेला वाहून घेतले
नुकतेच प्रा. सुनंदा काटे यांच्या आईचे निधन झाले असतानाही वैयक्तिक दुःख बाजूला ठेवत त्यांनी समाजसेवेलाच प्राधान्य दिले आहे. दुःखाच्या क्षणीही त्या प्रचारात सक्रिय राहून नागरिकांशी संवाद साधत आहेत. “आईने दिलेल्या संस्कारांचीच ही शिकवण आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली





















































