खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त संपुर्ण भारतामध्ये सेवा सप्ताहचे अभियान राबविले जात आहे. यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्यांनी आपल्या जीवाची बाजी लावून आप आपल्या क्षेत्रात कार्य केले आहे असे पत्रकार, सामजिक कार्यकर्ते, आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय सेवा, औषध पुरवणारे केमिस्ट, डॉक्टर, अत्यावश्यक सेवा देणारे, धान्य विक्रेते, भाजी विक्रेते, दूध विक्रेते अशा विविध क्षेत्रात योगदान दिलेल्यांचा सांगवी येथे पिंपरी चिंचवड शहर पोलिस आयुक्तालयाचे विधी अधिकारी प्रसाद सांगळे यांच्या हस्ते कोरोना योद्धा हा सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच खासदार राहुल गांधी यांच्या कल्पनेतून न्याय ही देशाची गरज या योजनेअंतर्गत गरजूंना जीवनाव्यश्यक वस्तूंच्या किटचे वाटप जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बंडोपंत शेळके, वासुदेव मालुतुमकर, रमेश दादा बागवे प्रतिष्ठानचे अध्यक्ष शेषराव कसबे पिंपरी चिंचवड शहर जिल्हा युवा काँग्रेसचे सरचिटणीस विरेंद्र गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. कोरोना योद्धा म्हणून मिलींद शिवाजी संधान, बलभिम गोवर्धन भोसले, रमेश पांडूरंग मोरे, ज्ञानेश्वर गोविंद जाधव, अरुण पवार, फ्रान्सिस ब्राम्हणे, अक्षय गणपत नलावडे, कुनाल अशोक कांबळे, लक्ष्मण गणपतराव म्हेत्रे, राजेश साधू भडकवाड, भानुदास सिरवी, रामचंद्र बालाजी भोसले, किसन शिंदे, दिलीप नाईकनवरे, हेमंत भांरबे, डेव्हिड काळे, अपूर्वा त्रिभुवन, फ्रान्सीस गजभिव, तुषार पाटील, डॅनियल सोनेकर, यांना सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाची प्रस्तावना चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष संदेश बोर्डे यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्यवान पवार ( सर) यांनी केले. आभार प्रदर्शन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा युवा काँग्रेसचे सरचिटणीस कुंदन कसबे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोहित शेळके सनी कसबे नरेंद्र कसबे राजु खुडे यांनी अधिक परिश्रम घेतले.





















































