पिंपरी चिंचवड महानगरपालिका हि पिंपरी, चिंचवड,भोसरी व आकुर्डी हि चार गाव एकत्र करुन कै.अण्णासाहेब मगर नगरपालिका स्थापन करुन या शहराची मुर्हूतमेढ रोवली. त्यानंतर सन १९८२ रोजी यांनी महानगरपालिकेची स्थापना केली. या महानगरपालिका झाल्यामुळे पिंपरी चिंचवड शहरामध्ये विविध उद्योग आल्यामुळे या शहराचा विकास इपाट्याने झाला. आज या शहराची ओळख सर्वात वेगाने विकसित होणारे शहर म्हणून देशात ओळखले जाते. हे सर्व झाले कै. अण्णासाहेब मगर यांनी दूरदृष्टीने विचार करुन नगरपालिका स्थापन केल्यामुळे व नंतर महानगरपालिका झाल्यामुळे शक्य झाले. पिंपरी चिंचवड शहराच्या निर्मितीचे शिल्पकार कै. अण्णासाहेब मगर यांच्या १०१ व्या स्मृती दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विठ्ठल (नाना) काटे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते फजल शेख, महिलाध्यक्ष वैशाली काळभोर, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, विद्यार्थी अध्यक्ष सुनिल गव्हाणे, युवती अध्यक्ष वर्षा जगताप, सेवादल अध्यक्ष महेश झपके, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष विनोद कांबळे आदीसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी माजी पदाधिका-यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.





















































