इरणी वस्तीतून मुस्कटदाबी करून अटक; दोन गुन्ह्यांची उकल, इतर राज्यांतील गुन्ह्यांचा तपास सुरू
पिपीसी न्यूज प्रतिनिधी ,
अजय जाधव| पिंपरी-चिंचवड |
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत वृद्ध महिला व पुरुषांना पोलिस असल्याचे भासवून त्यांच्या सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक करणाऱ्या सराईत आरोपीला गुन्हे शाखा युनिट–२ने अटक केली आहे. हा आरोपी इरणी वस्ती, अंबिवली, ठाणे येथून ताब्यात घेण्यात आला.
या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाणे गु.र.क्र. ८२/२०२६ (भा.न्या.सं. कलम २०४, ३९९(२), ३(५)) तसेच देहूरोड पोलीस ठाणे गु.र.क्र. २५४/२०२५ (भा.न्या.सं. कलम २०४, ३९९(२), ३(५)) अन्वये गुन्हे दाखल असून सदर दोन्ही गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखा युनिट–२ने तपास हाती घेतला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक मयुरी साळुंखे, मोहम्मद गौस नदाफ, पोलीस हवालदार तुषार शेटे, विक्रम कुदळ, प्रशांत सैद ,विकांत चव्हाण, अली शेख, तसेच पोलीस शिपाई दीपक शिरसाट, कृष्णा शितोळे,सुखदेव गावंडे , अमर राणे, दिनकर आडे, रवी पवार, धनंजय जाधव यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
ही कारवाई पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली व अपर पोलीस आयुक्त सागर आव्हाड, पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रदीप जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे–१) विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
आरोपीविरोधात विविध राज्यांमध्ये अशाच स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती असून त्याबाबत पुढील तपास सुरू आहे. नागरिकांनी अशा बनावट पोलिसांच्या फसवणुकीपासून सावध राहावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.


















































