*यशस्वी अकॅडमी आणि एनएसडीसी इंटरनॅशनलच्या संयुक्त विद्यमाने स्थापित आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास केंद्रातील फेमिना फ्लॉन्ट ब्युटी अकॅडमीचे उद्घाटन संपन्न.*
(ppcnews.in)
*पुणे, दिनांक 23 जून 2025*: कौशल्य प्रशिक्षणाद्वारे महिलांनी आर्थिक स्वातंत्र्याच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्यासाठी प्रयत्नशील व्हायला हवे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केले.आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास केंद्राअंतर्गत यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स संस्थेच्या वतीने पुणे येथे सुरू करण्यात आलेल्या फेमिना फ्लॉन्ट अकॅडमी चे उद्घाटन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या हस्ते आज करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या.
कौशल्य विकास प्रशिक्षणाद्वारे देशातील युवा पिढीला आत्मनिर्भर करण्यासाठी यशस्वी संस्था आणि एनएसडीसी इंटरनॅशनल महत्त्वाची भूमिका बजावत आहे,असेही रूपाली चाकणकर यावेळी म्हणाल्या.

यावेळी कार्यक्रमाला राज्य महिला आयोगाच्या सचिव नंदिनी आवाडे यांनी सांगितले विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुणे शहरात आता या आंतरराष्ट्रीय स्तरावरील कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रामुळे राज्यातील व देशभरातील युवक-युवतींसाठी करिअरच्या व्यापक संधी देणारे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे, ही अतिशय आनंदाची बाब आहे.
महिला सशक्तीकरण या संकल्पने अंतर्गत जशी राज्यव्यापी महिला बचत गटाची एक या अकॅडमीमधील अभ्यासक्रमांबद्दल सविस्तर माहिती देत सदर अभ्यासक्रम इंग्रजीसह मराठी भाषेतूनही शिकविले जाणार असल्याचे सांगितले.

तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ‘यशस्वी’ संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांनी सांगितले की,आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेली कुशल मनुष्यबळाची गरज भागवण्यासाठी भारत सरकारने एनएसडीसी इंटरनॅशनलच्या माध्यमातून विशेष उपक्रम म्हणून सुरू केलेले हे आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास केंद्र हे भारतातील युवकांना कौशल्य प्रशिक्षणाद्वारे थेट आंतरराष्ट्रीय स्तरावरील रोजगार संधी मिळवून देण्यासाठी पुढाकार घेत आहे. याचबरोबर परदेशातील नोकरीच्या संधी मिळवताना भारतीय युवकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी एनएसडीसी इंटरनॅशनल ने विविध देशांसोबत करार केले आहेत.
राज्यातील विद्यार्थी विद्यार्थिनींना आंतरराष्ट्रीय स्तरावरील ब्युटी अँड वेलनेस क्षेत्रातील प्रशिक्षण या अद्ययावत कौशल्य विकास केंद्रामध्ये देण्यात येणार आहे.तसेच प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरील उपलब्ध असलेल्या नोकरीच्या तसेच रोजगाराच्या संधी या अकॅडमीतील विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे.
एनएसडीसी इंटरनॅशनलचे महाराष्ट्र राज्यातील हे पहिलेच आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास केंद्र असून ब्युटी अँड वेलनेस क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण तज्ञ प्रशिक्षकांच्या माध्यमातून इथे दिले जाणार आहे.तसेच सिडेस्को इंटरनॅशनलचे सुमारे 65 हुन अधिक देशांची मान्यता असलेले अभ्यासक्रम देखील या अकॅडमीमध्ये शिकविले जाणार आहेत,असेही विश्वेश कुलकर्णी यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला विद्यार्थी, विद्यार्थिनी,पालक तसेच ‘यशस्वी’ संस्थेचे प्रशिक्षक आदी उपस्थित होते.
सामूहिक राष्ट्रगीत गायनाने उद्घाटन सोहळ्याची सांगता झाली.
या कार्यक्रमासाठी अमृता तेंडुलकर,आदिती कांबळे, प्रशांत कुलकर्णी,अमला करंदीकर, प्रसाद शाळीग्राम आदींनी विशेष परिश्रम घेतले.





















































