पी पि सी न्यूज; प्रतिनिधी अजय जाधव;
पिंपरी चिंचवड व पुणे परिसरातून बुलेट चोरी करून ति उस्मानाबादला पाच दहा हजार रुपयात विक्री करणाऱ्या टोळीला हिंजवडी पोलिसांनी नुकतीच
अट्टक केली आहे.आरोपी कडून आठ लाख रुपये किमतीच्या आठ बुलेट जप्त करण्यात आल्या आहेत.सुमित सुनील सावंत ( वय 19, रा. पारखे वस्ती हिंजवडी), प्रशांत भीमराव गायकवाड (वय 19, रा. डांगे चौक, थेरगाव), चेतन उर्फ श्रीपती शिवाजी कातपुरे (वय 19, रा. लक्ष्मी नगर, थेरगाव) वैजनाथ नागनाथ चौधरी (वय २२, रा. देवगाव, ता. परांडा, जी. उस्मानाबाद) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचे साथीदार उर्फ आशिष भीसे आणि फ्रान्सिस (पुर्ण नाव पत्ता माहीती नाही) त्यांचा पोलीस शोध घेत आहेत
मारुंजी हिंजवडी परिसरातून दुचाकी चोरणारे दोघांपैकी एक जण हिंजवडीतील कोलते-पाटील गेट येथील कट्ट्यावर बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून पाठलाग करीत पोलिसांनी रोहित वेताळ याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता मारुंजी गावातून दुचाकी चोरल्याची कबुली त्याने दिली. त्याच्याकडे अधिक तपास केला असता इतर आरोपींनी हिंजवडी परिसरातून पाचं, चिंचवड, वारजे माळवाडी व इतर परिसरातून प्रत्येकी एक अशा आठ बुलेट चोरून फ्रान्सिस यांच्या मदतीने उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम परांडा याठिकाणी वैजनाथ चौधरी व इतर नागरिकांना या बुलेट पाच ते दहा हजार रुपयांना विकल्याचे निष्पन्न झाले.
ही कारवाई पो. आयुक्त कृष्णप्रकाश, अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे ,उपायुक्त विनायक ढाकणे ,उपायुक्त सुधीर हिरेमठ ,सहाय्यक आयुक्त श्रीधर जाधव ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी ,पोलीस निरीक्षक (गुन्हे )अजय जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहाय्यक निरीक्षक सागर काटे पोलीस कर्मचारी मारणे, किरण पवार ,शिंदे ,अंकित शेख, कुंभार, कुणाल शिंदे ,विवेक गायकवाड, राणे ,पालवे ,गडदे, चव्हाण, कोळी, गुमलाडू यांच्या पथकाने केली.





















































