*जागतिक पातळीवर आरोग्य व सामाजिक शांतता यासाठी केलेल्या कामाची पोहोच पावती*
पुण्यातील डॉ.अविनाश सकुंडे यांची जागतिक पातळीवर आरोग्य व सामाजिक शांतता यासाठी केलेल्या कामाची दखल घेऊन इंटरनॅशनल युथ डेव्हलपमेंट कौन्सिल या१२२ देशात कार्यरत असणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या सल्लागार समितीवर नुकतीच नेमणूक करण्यात आली.
आंतरराष्ट्रीय मानव अधिकार राजदूत संघटना माहिती अधिकार,पोलिस मित्र व पत्रकार संरक्षण सेना ,भारतीय महाक्रांती सेना पक्ष सामाजिक संघटना असून या सेने मार्फत संपूर्ण भारतभर भा. म. सेनेचे राष्ट्रिय अध्यक्ष डॉक्टर अविनाश सकुंडे यांनी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम केलेले आहे.लवकरच मलेशिया येथे होणाऱ्या संघटनेच्या गोलमेज परिषदेचे निमंत्रण या माध्यमातून सकुंडे यांना देण्यात आले. सल्लागार समिती पदी निवडल्या निवड झाल्यानंतर भारतातील युवकांसाठी बेरोजगारी तसेच नोकरीविषयक कामाकरता विशेष लक्ष देऊन काम करण्याचा निर्धार डॉ.अविनाश सकुंडे यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी समाजातील विविध संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर अविनाश सकुंडे यांचे अभिनंदन करूनआभार मानले.