पि पी सी न्यूज;प्रतिनिधी अजय जाधव!
आज दिनांक रोजी खंडणी दरोडा विरोधी पथकाचे अधिकारी व कर्मचारी असे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील टॉप 25, पाहिजे फरारी, तडीपार आरोपीतांचा शोध घेत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार गणेश हजारे यांना त्यांचे खास बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, तडीपार गुन्हेगार नागेश भंडारी हा नाना नानी पान शॉप समोर, म्हाताेबानगर झोपडपट्टी, वाकड, पुणे येथे थांबलेला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाले वरून, खंडणी दरोडा विरोधी पथकाने सदर ठिकाणी जाऊन, तडीपार आरोपी नामे नागेश बाबू भंडारी, वय २० वर्ष, रा. म्हाताेबानगर झोपडपट्टी, माताजी मेडिकल समोर, वाकड पुणे यास ११:५० वाजता ताब्यात घेतले, त्यास मा. पोलिस उप आयुक्त, परिमंडळ २, पिंपरी चिंचवड यांचेकडील तडीपार आदेश क्र ०८/२०२० दि.१जून २० अन्वये सहा महिने कालावधीकरिता, तडीपार असतानाही त्याने महाराष्ट्र शासनाची अथवा मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ २, पिंपरी चिंचवड यांची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता तो नाना-नानी पान शॉप समोर, म्हाताेबानगर झोपडपट्टी, वाकड पुणे येथे वावरत असताना दिसून आला म्हणून त्याचे विरुद्ध, वाकड पोलिस ठाणे येथे महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





















































