पुणे शहरातील सर्व टिव्ही चॅनेल मिडीया मधील पत्रकार, कॅमेरामन तसेच आपल्या भागातील सकाळचे पत्रकार सौ. जागृतीताई कुलकर्णी, पुढारीचे श्री. दत्ताजी नलावडे, व लोकमतचे श्री. कल्याण अवताडे , टीव्ही मीडियाचे पत्रकार श्री. सज्जा या सर्व पत्रकार बंधू भगिनींना ऑक्सिमीटर मशीन, वाफेचे मशीन, सॅनिटायझरची बॉटल ( ही सर्व पूर्वतयारी श्री. देशमुख यांनी करुन ठेवली होती पण त्यांचे आकस्मित निधन झालेने आपण हा कार्यक्रम थोडा नंतर घेतला) तसेच पावसात कागदपत्रे भिजू नयेत म्हणून पाऊच किट आणि मास्क देण्यात आले.
याप्रसंगी भाजपा पुणे शहराध्यक्ष मा.जगदीशजी मुळीक साहेब यांनी अल्पकालावधीत कळवून देखील सदर उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त विठ्ठलवाडी येथील विठ्ठल मंदिरासमोर हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी दोन मिनिटे उभे राहून देशमुख यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी आमचा मित्र परिवारा मधील स्वामी बॅगचे मालक राहुलजी जगताप ,रविजी चौधरी, मिलिंद पुणेकर, किशोरजी कुलकर्णी, राहुलजी जोशी, अजय भानोसे, सोमशेखर कमतगी, राहूल रुपदे आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम सोशल डिस्टन्सिंगचे व्यवस्थित पालन करून कमीतकमी मित्रपरिवाराच्या उपस्थितीत अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडला.





















































