पि.पि. सी.न्यूज. प्रतिनीधी अजय जाधव!
दिनांक ३/११/२०२० रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील ताकवले, पुणे शाखा, युनिट १ पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गंभीर गुन्ह्यांना प्रतिबंध होण्यासाठी युनिट १ च्या हद्दीत सरकारी वाहनाने पेट्रोलिंग करत होते. पेट्रोलिंग करीत असताना कुंभार वाडा कसबा पेठ पुणे येथे पोलीस नाईक सचिन जाधव यांना त्यांच्या खबऱ्या मार्फत माहिती मिळाली एक तडीपार इसम गुन्हा करण्याच्या उद्देशाने शिवाजीनगर परिसरात आढळून आला आहे त्याच्याकडेच पिस्टल सारखेहत्यार आहे. अशी खात्रीशीर बातम्या मिळाल्यामुळे पोलीस निरीक्षक सुनील ताकवले यांनी पोलीस उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी, पोलीस नाईक सचिन जाधव, इमरान शेख, महेश बामगुडे, सुधाकर माने, तुषार माळवदकर यांनी वरील स्टाफला ग्रुपमध्ये तयार करून बातमी च्या ठिकाणी आजूबाजूस थांबून बातमीदाराने दिलेल्या बातमीप्रमाणे इसम दिसताच सदर आरोपीस पकडले. तडीपार आरोपी जयेश विजय लोखंडे (वय २०,रा.२२४ मंगळवार पेठ जुना बाजार पुणे) असल्याचे कळाले. त्यांची अंगझडती घेण्यात आली असता कमरेला लावलेले व पिशवीत असलेले असे दोन गावठी पिस्टल व चार जिवंत काडतुसे किंमत रुपये ८०,८००/-रु चा मालं त्याच्या जवळ सापडला. तो जप्त करून आरोपीविरुद्ध पोलीस नाईक सचिन जाधव यांनी शिवाजीनगर पोलीस ठाणे पुणे येथे फिर्याद दिली आहे.
सदर आरोपीविरुद्ध यापूर्वी फरासखाना, शिवाजीनगर, समर्थ, चतुर्श्रुंगी पोलिस ठाणे येथे शरीरा विरुद्ध, वाहन तोडफोड वं जाळपोळ,अर्म अॅक्ट एकूण आठ गुन्हे दाखल आहेत. तसेच दिनांक ६/०८/२०२० रोजी पासून पुणे जिल्ह्यातून पुणे शहरातून दोन वर्षा करता तडीपार केले असताना तो आदेशाचा भंग करून पुणे शहरात फिरत असताना त्याला पकडण्यात आले. पुढील कारवाईसाठी त्यात शिवाजीनगर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात दिले आहे.
सदरची कामगिरी गुन्हे शाखा पुणे शहर चे अप्पर पोलीस आयुक्त, अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त गुन्हे, बच्चन सिंग, सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेंद्र देशमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-१ गुन्हे पथकातील पुणे शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील ताकवले,पोलीस उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी युनिट-१ गुन्हे पथकातील पोलिस कर्मचारी सचिन जाधव, इमरान शेख, महेश बामगुदे, योगेश जगताप, सुधीर माने, तुषार माळवदकर यांनी केली आहे.
![*तडीपार केलेल्या आरोपी कडून दोन गावठी पिस्टाल चार जिवंत काडतुसे जप्त,युनिट -१गुन्हे शाखेच्या कामगिरी.*](https://ppcnews.in/wp-content/uploads/2020/11/IMG_20201104_215300.jpg)
*तडीपार केलेल्या आरोपी कडून दोन गावठी पिस्टाल चार जिवंत काडतुसे जप्त,युनिट -१गुन्हे शाखेच्या कामगिरी.*
Share this: