पि. पी. सी. न्युज प्रतिनिधी अजय जाधव!
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या पश्चिम महाराष्ट्र समन्वयक का विरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात नुकताच बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. मागील काही दिवसांपासून या समन्वयक विरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता. पतीला ठार करण्याची धमकी देत आरोपीने महिलेवर लैंगिक अत्याचार केले होते.
याप्रकरणी पोलिसांनी महिलेसह सुनील मधुकर जगताप (वय ५२ रा.मुंढवा), कोमल सिंग डोंगर सिंग वाणी (वय ४५ रा मुंढवा), राजेश काळूराम गायकवाड (वय ४३ रा खराडी) असा गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. बलात्कार, फसवणूक, जीवे मारण्याची धमकी आणि शिवीगाळ या करता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खराडी परिसरातील एका ४५वर्षीय महिलेने फिर्याद दाखल केली आहे. बाबा या फिर्यादीत लैंगिक अत्याचाराची व्हिडिओ चित्रीकरण वायरल करण्याची धमकी देत आरोपी जगताप हा महिलेला वारंवार ब्लॅकमेल करत होता. फिर्यादी महिलेच्या पतीचे २००७पासून जमिनीबाबत काही बिल्डरांचा सोबत वाद चालू होते. या जमिनी संदर्भात त्यांच्या पतीचे न्यायालयात येणे-जाणे होते. आरोपी सुनील जगताप त्याचेही काही जमिनीचे प्रकरण संदर्भात न्यायालयात येणे-जाणे सुरू होते यातूनच दोघांची ओळख झाली होती. या ओळखीतून सुनील जगताप फिर्यादीच्या घरी येत जात होता. फिर्यादीच्या पतीचे काही बांधकाम व्यावसायिकांनी सोबत जमिनीचे वाद सुरू होते. यासंदर्भात सुनील जगताप यांना माहिती झाली होती. त्यांनी फिर्यादीच्या पतीशी वाद सोडून जागा विकसित करून देतो असे बोलणे केले होते .मात्र त्यांच्या पतीने त्यास सहमती दाखवली नाही. त्यामुळे त्याने फिर्यादीला मोबाईल कॉल करून तुमचा पती पुढाकार घेत नाही तुम्ही पुढाकार घ्या, मी माझ्या ओळखीच्या एका बांधकाम व्यावसायिकाच्या माध्यमातून तुमची जागा विकसित करून देतो असे अमिश दाखवले. त्यानंतर त्यांना भेटायला सोमवार पेठ परिसरात बोलून घेतले तेथे एका कार्यालयात बलात्कार केला. या घटनेच्या वेळी कार्यालयात कोमल सिंग, राजेश आणि महिला आरोपी उपस्थित होते. हा प्रकार २०१६दरम्यान घडला होता.यानंतर २०१९पर्यंत वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी फिर्यादीला धमकावत बलात्कार करण्यात आल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे. आरोपीने लैंगिक अत्याचाराची चित्रीकरण केले सांगत वारंवार फिर्यादी महिलेस ब्लॅकमेल करत होता. तसेच स्वतःच्या चार चाकी जबरदस्तीने बसून धमकावून विनयभंग केला. त्यानंतर पतीच्या जीवाची बरेवाईट करण्याची धमकी दिली.दरम्यान १० जून २०२० मध्ये फिर्यादी व त्यांच्या पतीने गरजूंसाठी भोजन केंद्र उभारले होते ते आरोपी कोमल सिंग डोंगर सिंग यांनी अनेक गाडीतून येऊन फिर्यादीला शिवीगाळ केली होती तसेच त्यांच्याकडून रोकड घेऊन त्यांची फसवणूक केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप जोरे करत आहे.





















































