लॉकडाऊन च्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने मिळकत कर भरण्याची मुदत वाढवली असून ३० जून २०२० पर्यंत नागरिक मिळकत कर भरू शकतात.
महापौर मुरलीधर मोहळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासणे आणि आयुक्त शेखर गायकवाड यांच्यात या संदर्भातील चर्चा होऊन हा निर्णय घेण्यात आला.
मिळकत धारकांनी सन २०-२१ या वर्षातील संपूर्ण मिळकत कर भरून सर्वसाधारण करामध्ये ५ ते १० टक्के लाभ घेऊन पुणे महापालिकेस सहकार्य करावे असे महापालिकेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.





















































