पुणेः- स्टुडंट हेल्पींग हँड संस्थेच्या वतीने शिक्षणमंञी उदय सामंत यांना आज विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये
1) शिवभोजनथाळी विदयापिठ व काँलेज स्तरावर सुरु करावी.
2) स्वच्छ वारी निर्मल वारी 2019 या गिनिज बुक वर्ल्ड रेकाँर्ड मध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करावी.
3) अनामत रक्कम परतावा करण्यास काँलेज व विदयापीठास सुचना देण्यात याव्यात.
4) आपत्ती व्यवस्थापन समितीने करोनाकाळात 80 लाख रु.खर्च प्रकरणी चौकशी करावी.
5) करोना काळात शैक्षणिक शुल्क 50% परतावा विदयार्थीना करावा, अशी मागणी संस्थेचे अध्यक्ष कुलदीप आंबेकर यांनी केली आहे.