पुणे :- महाराष्ट्र राज्यातील शासकीय व स्वयंसेवी बालगृह, निरिक्षणगृह व विशेषगृहामधील 16 ते 18 वयोगटातील प्रवेशित बालके तसेच 19 ते 21 वयोगटातील संस्थेतून बाहेर पडलेल्या युवक/ युवतींकरीता महाराष्ट्र राज्य परिवीक्षा आणि अनुरक्षण संघटना या कार्यालयात नुकतेच राज्यस्तरीय मदत केंद्र सुरु करण्यात आले असल्याचे कार्यालयाचे कार्यकारी सचिव डी. एस. कुटे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य परिवीक्षा आणि अनुरक्षण संघटना, 1105, रविवार पेठ, मुकुंद भवन, पुणे- 411002 येथे किंवा दूरध्वनी क्रमांक 020-24478634 अथवा भ्रमणध्वनी क्रमांक 8530094848/ 8530024343 यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.