पुणेः- सध्या देशामध्ये केंद्र सरकारने अवाजवी लावलेला इंधन कर हा जास्त प्रमाणात आहे, अच्छे दिन च्या नावाखाली कच्चे दिन दाखवायला सुरुवात 2014 पासूनच झाली आहे, याचे दीर्घ परिणाम आणि पडसाद उमटत आहे. सर्वसामान्य लोकांना यामुळे त्रास आणि महागाईला सामोरे जावे लागत आहे, दिवसेंदिवस दिवस गॅसची किंमत आणि पेट्रोल डिझेलच्या किंमती उच्चांक गाठत आहेत, हा लोकांचा केलेला विश्वासघात आहे, यामुळे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस तर्फे व पुणे शहर युवक काँग्रेस च्या वतीने भापकर पेट्रोल पंप पुणे येथे वाढत्या इंधन दर विरुद्ध मोदी सरकार विरुद्ध विश्वासघात आंदोलन करण्यात आले.
या प्रसंगी काँग्रेसचे जेष्ठ नेते अभय छाजेड ,पुणे महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सोनाली मारणे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल मलके, उपाध्यक्ष सौरभ अमराळे, आशिष व्यवहारे, पर्वती मतदार संघ अध्यक्ष सुजित लाजूरकर, अभिजीत रोकडे, स्वप्नील नाईक, कुणाल काळे, परवेज तांबोळी, अक्षय नवगिरे, सुजित गोसावी, निलेश सांगळे, प्राजक्ता कलमानी, वैष्णवी किराड, ओंकार मोरे, धनराज माने, ऋत्विक घनवट व सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
आंदोलन प्रसंगी
पेट्रोल भरणाऱ्या नागरिकांना गुलाबाचे फुल देऊन मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. आंदोलनाचे आयोजन पुणे शहर युवक अध्यक्ष विशाल मलके यांच्या अध्यक्षतेखाली पर्वती मतदार संघ अध्यक्ष सुजित लाजूरकर आणि पुणे शहर युवक काँग्रेस उपाध्यक्ष सौरभ अमराळे यांनी केले.