पिपीसी न्यूज नेटवर्क;
ठाणे शहराचे माजी महापौर, आमदार आणि कोळी समाजाचे नेते अनंत तरे यांचे आज निधन झाले. त्यांचे वय 66 होते. कोविडने गेले 2 महिने आजारी होते. ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मंगळवारी दुपारी दोन वाजता ठाण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ठाण्याचे 3 वेळा महापौर पद , विधान परिषदेचे सदस्य पद त्यांनी भूषविले होते , एकविरा देवस्थान ट्रस्ट , कार्ला तसेच अखिल भारतीय कोळी समाज संघटनेचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा, दोन नातवंडे भाऊ असा परिवार आहे.
![*ठाणे शहराचे माजी महापौर, आमदार आणि कोळी समाजाचे नेते अनंत तरे यांचे आज निधन.*](https://ppcnews.in/wp-content/uploads/2021/02/20210222_190651.jpg)
*ठाणे शहराचे माजी महापौर, आमदार आणि कोळी समाजाचे नेते अनंत तरे यांचे आज निधन.*
Share this: