पुणे महानगरपालिका व भारतामध्ये डायग्नॉस्टिक्स सेवा पुरविण्यात अग्रेसर असलेली क्रस्ना डायग्नॉस्टिक्स प्रा. लि. या संस्थेनं मार्फत विषाणू (Covid-१९) विषाणूची स्वाब संकलन व मोबाईल एक्स-रे , रक्त चाचणी, रक्तदाब व तापमान यांची चाचणी करणाऱ्या अत्याधुनिक, वातानुकूलित फिरत्या बसचे लोकार्पण सोहळा उद्या दिनांक २०/०५/२०२० रोजी सकाळी १०.०० वाजता पुणे महानगरपालिकेचे पदाधिकारी महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेता, सर्व गटनेते, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त जनरल अतिरिक्त आयुक्त विशेष आणि क्रस्ना डायग्नॉस्टिक्सच्या व्यवस्थापकीय संचालिका पल्लवी जैन यांच्या उपस्थितीत पुणे महानगरपालिका मुख्य इमारत येथे लोकार्पण सोहळा होणार आहे.



















































