प्रतिनिधी: अजय जाधव
पिंपरी चिंचवड; मौजे पिंपळे गुरव प्रभाग क्रमांक 29 मध्ये आज अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये पिंपळे गुरव येथील 6 अनधिकृत आर. सी.सी बांधकामे अंदाजे क्षेत्रफळ 8000 चौ. फू बांधकामावर कारवाई करण्यात आली.
सदर कारवाई क्षेत्रीय अधिकारी ‘ड’ प्रभाग यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता सुनील भागवानी बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग ‘ड’ प्रभाग यांच्या पथकाने केली, सदर कारवाई 2 पोकलेन मशीन, 2 जे. सी. बी, 1 ट्रक, 3 ट्रॅकर ब्रेकर, तसेच 12 मजूर, 10 मनपा अधिकारी व कर्मचारी तसेच 35 मनपा पोलिस कर्मचारी यांच्या सहकार्याने करण्यात आली.