मोशीः- उपमहापौरपदाच्या शर्यतीत असलेले मोशी येथील नगरसेवक वसंत बोराटे यांचे नाव डावलून दिघी येथील नगरसेविका हिराबाई घुले यांना भाजपकडून उपमहापौरपदाची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे मोशी ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.
उपमहापौरपदाची निवडूक जाहीर झाल्यानंतर वसंत बोराटे यांना संधी मिळणार अशी जोरदार चर्चा भाजपच्या नगरसेवकांमध्ये होती. वरिष्ठांनी देखील तशी आश्वासने दिली होती; मात्र ऐनवेळी संधी हुकल्याने बोराटे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे.
मोशीच्या वाट्याला पाच वर्षात सत्ताधारी भाजपाच्या काळात क्रिडा समितीचे सभापतीपद वगळता एकही विशेष पद आले नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मोशीकर आता नाराजी व्यक्त करत आहे.
या पदाबाबत मी स्वत: इच्छा व्यक्त केली नव्हती. भाजपामधूनच माझे नाव या पदासाठी चर्चेत आणले गेले होते. ऐनवेळी मला संधी मिळाली नाही. मी आमदार महेश लांडगे किंवा पक्षावर नाराज नाही. मोशीकर ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी याबाबत गैरसमज करुन घेऊ नये. दादांच्या मागे मी कायम उभा राहणार असून अफवांवर विश्वास ठेवू नये.
नगरसेवक वसंत बोराटे