खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा यांची कामगिरी
पिंपरी चिंचवड :- पिंपरी चिंचवड शहरामध्ये चेन चोरी व वाहन चोरीच्या घटना घडत असल्यामुळे पोलीस रिसर्च कौन्सिल करण्याचे आयुक्त कृष्ण प्रकाश सो, यांनी चोरीच्या घटनांचा आढावा घेवुन, गुन्हे शाखेकडील अधिकारी अमलदार यांना चोरीच्या गुन्हयांना प्रतिबंध करुन, गुन्हे उघडकीस आणणेबाबत दिलेल्या आदेशा प्रमाणे, खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औरान पोळ यांनी पोलीस उपनिरीक्षक महेंद्र पाटील शाकीर जिनेडी यांची २ पथके तयार करुन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील उघडकीस न आलेल्या स्नॅचिंग गुन्हयांचा आढावा घेवुन रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेत असताना पोलिस अंमलदार आशिक बोटके, निशांत काळे व प्रदीप गोडांबे यांना बातमीदारांकडून अशी माहिती मिळाली की, चेन चोरी करणारे दोन इसम एका काळ्या रंगाचे नंबर नसलेल्या आपाची मोटार सायकलवरून देहूफाटया कडुन मोशीच्या दिशेने येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डुडुळगाव या ठिकाणी सापळा रचुन १) सफिर फिरोज खान वय -३५ वर्षे रा. दत्तवाडी, सिंहगड कॉलेज रोड , लोणावळा पुणे, २) मोहम्मद उर्फ डॉन शाबुद्दीन इराणी वय -२५ वर्ष रा. गांधी झोप. शिवाजीनगर, पुणे यांना काळ्या रंगाच्या आपाची मोटार सायकलसह ताब्यात घेवुन, चौकशी करुन त्यांना वाकड पोलिस ठाणे गुन्हा रजि.नंबर ३५/२०२१ भादवि कलम ३९२.३४ या गुन्ह्याचे कामी दिनांक ०५/०२/२०२१ रोजी ७:१५ वाजता अटक करुन त्यांची पोलिस कोठडीची रिमांड घेण्यात आली.
पोलिस तापासामध्ये, दोन्ही आरोपी व त्यांचा साथीदार आरोपी मोहसीन लालु जरूरी रा.रायसेन मध्यप्रदेश हे चोरलेल्या वाहनांचा वापर महिलांच्या गळ्यातील चेन स्नॅचिंग करण्यासाठी करत होते. त्यांच्याकडुन चेन स्नॅचिंग गुन्हयातील ११,०००,०० / -रु . किंमतीचे २२० ग्रॅम सोन्याचे दागिने व १,६५,००० / -रु . किंमतीचे २ दुचाकी वाहने असा एकुण १२.६५,००० / -रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन, त्यामध्ये वाकड, सांगवी व देहुरोड पोलीस स्टेशन कडील प्रत्येकी – चिंचवड पो.स्टे. कडील – ०२, चिखली, एमआयडीसी भोसरी, दिघी, तळेगाव दाभाडे, चाकण तसेच गंगाखेड ( परभणी ) पोलीस स्टेशन कडील प्रत्येकी – ०१ असे चेन चोरीचे १४ गुन्हे, पोलीस बतावणी ०१ गुन्हा व वाहन चोरीचे ०२ गुन्हे एकुण १७ गुन्हे उघडकीस आणले आहेत. तसेच आरोपी मोहम्मद उर्फ डॉन शाबुद्दीन इराणी याच्या विरुध्द पुणे शहर, पुणे ग्रामीण येथे जबरी चोरी व वाहन चोरीचे ०९ गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त सुधीर हिरेमठ, सहा.पोलीस आयुक्त श्रीमती प्रेरणा कट्टे, यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, पोलीस उप- निरीक्षक महेंद्र पाटील व शाकीर जिनेडी तसेच पोलीस अंमलदार अशोक दुधवणे, गणेश हजारे, निशांत काळे, शकुर तांबोळी, आशिष बोटके, प्रदीप गोडांबे, किरण काटकर, सुधीर डोळस, सुनिल कानगुडे, गणेश गिरीगोसावी, विजय नलगे, संदीप पाटील, शैलेश मगर, आशोक गारगोटे, प्रदीप गुट्टे, तांत्रिक विश्लेषण विभागातील राजेंद्र शेटे, नागेश माळी व वाकड पोलीस स्टेशनचे जावेद पठाण यांच्या पथकाने केली आहे .



















































