पुणे:- राज्यात सध्या एक मेपर्यंत कडक निर्बंध लादलेले आहेत. तरीसुद्धा करोनाच्या नव्या रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसंदिवस वाढतच आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. दरम्यान आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. सर्व मंत्र्यांनी उद्या ८ वाजल्यापासून कडक लॉक डाऊन जाहीर करावा अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली असून मुख्यमंत्री त्याबाबत लवकरच निर्णय घेऊन घोषणा करणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
आरोग्यमंत्र्यांनी थोडक्यात महाराष्ट्र उद्या रात्री ८ वाजल्यापासून कडक लॉकडाऊन असणार आहे असे सूचित केले आहे. राज्यात उद्यापासून संपूर्ण लॉक डाऊन ची घोषणा कधी होऊ शकते. त्या बाबतची नियमावली लवकरच जाहीर केली जाऊ शकते.
मुख्यमंत्री आज किंवा उद्या राज्यातील संपूर्ण लोक डाऊन चा निर्णय जाहीर करतील अशी माहिती नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. त्यामुळे सध्या लॉकडाउन बाबत ची नियमावली पुण्याचं काम चालू असल्याचं सांगण्यात आले आहे. लॉकडाऊन हा१५ दिवसांचा असावा अशी मागणी देखील मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली आहे.