दि. 21 एप्रिल 2021.
“प्रभू श्रीरामचंद्रांनी त्यांच्या जीवनातून जगण्याचा आदर्श निर्माण केला. धैर्य, शौर्य, स्नेह, त्याग, संयम, कर्तव्यनिष्ठेचं महत्व दाखवून दिलं. प्रभू श्रीरामचंद्र मर्यादापुरुषोत्तम होते. श्रीरामभक्ती व श्रीरामकथा देशवासियांसाठी जगण्याची ताकद आहे. श्रीरामभक्तीच्या सांस्कृतिक धाग्यानं आपण सारे जोडले गेलो आहोत. श्रीरामभक्तीचं आध्यात्मिक, सांस्कृतिक वैभव जपत असताना प्रभू श्रीरामचंद्रांनी दाखवलेल्या सत्याच्या, लोककल्याणाच्या मार्गावरुन चालण्याचा सर्वांनी प्रयत्न करुया. श्रीरामनवमीनिमित्त प्रभू श्रीरामांना भावपूर्ण वंदन. श्रीरामनवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा”





















































