प्रतिनिधी:- अजय जाधव
पुणे:- प्रवाशांना बाहेरगावी प्रवास करण्यासाठी कोरोना निगेटिव्ह चे बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीस हिंजवडी पोलिसांकडून नुकतीच अटक करण्यात आली. हिंजवडी पोलिस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक यांना खबऱ्या मार्फत माहिती मिळाली की, शनी मंदिर इंदिरा कॉलेज येथे दोन इसम हे प्रवाशांना प्रवास करण्यासाठी कोरोना निगेटिव्ह चे प्रमाण पत्र ५००/ते ६००/रुपयांना देत आहे. अशी खबर मिळताच हिंजवडी पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब यांनी तपास सुरू केला. सदर ठिकाणी जाऊन एका बनावट गिराईक तयार करून त्यास ५००/रुपये देऊन कोरोना निगेटिव रिपोर्ट देणाऱ्या कडे पाठवला असता. तो १५मिनिटात परत आला त्याच्या व्हाट्सअप वर स्वतःच्या नावाचा एक करो ना निगेटिव्ह रिपोर्ट ची पीडीएफ फाईल होती. त्यावरून बनावट रिपोर्ट बनवून देणारे दोन इसम यांना ताब्यात घेतले असता त्यांचे नाव १.) राजेशकुमार बस्तीराम वैष्णव वय २५ वर्ष रा. आहेर चेंबर्स फ्लॅट नं. १ शेवटचा बस स्टॉप धनकवडी पुणे(२) पत्ताराम केसारामजी देवासी वय ३३ वर्ष रा. भगवान नगर ,भूमकर वस्ती, वाकड, ता. मुळशी जि. पुणे अशी नावे सांगितली. त्यांच्याकडे असलेले मोबाईलचे व्हाट्सअप चेक केले असता व्हाट्सअप वर काही कोरोना निगेटिव्ह चे बनावट रिपोर्ट ची पीडीएफ फाईल मिळाली. सदर पीडीएफ रिपोर्ट हे आरोपी नामेराजू भाटी रा. वाकड पुणे व चिरंजीव यांनी तयार करून दिले असे सांगितले. कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट हे लाईफनीटी वेलनेस इंटरनॅशनल लिमिटेड बावधन पुणे यांचे असल्याने त्यांना पोलीस स्टेशन येथे बोलून सदर रिपोर्ट बाबत खात्री केली असता सदर चे कोरोना रिपोर्ट हे बनावट असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यावरून हिंजवडी पोलीस स्टेशन मध्ये सदर आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला साथीचे रोग अधिनियम १८९७ चे कलम ३ महा. कोवीड१९ उपायोजना २०२० चे कलम ११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून दखल गुन्ह्यात आरोपी यांना अटक करण्यात आलेली आहे. यातील दोन आरोपी फरार असून त्याबाबत हिंजवडी पोलीस तपास करत आहे. आरोपी यांच्याकडून २ मोबाईल फोन, ३०००/-रुपये रोख रक्कम, कोरोना निगेटिव्हचे एकूण २८ बनावट प्रमाणपत्र असे एकूण ३०,०००/-किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई पिंपरी-चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त मा. कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त मा. रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे मा. सुधीर हिरेमठ, परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मा. आनंद भोईटे, वाकड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव, यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे हिंजवडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, तपास पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर काटे, पोलीस उपनिरीक्षक समाधान कदम, यशवंत साळुंखे, पोलीस अमलदार बंडू मारणे, महेश वायबसे, किरण पवार, बाळकृष्ण शिंदे, नितीन पराळे, कुणाल शिंदे, शिवराम भोपे, चंद्रकांत गडदे, कारभारी पालवे, श्रीकांत चव्हाण, अमर राणे, सुभाष गुरव, दत्तात्रय शिंदे, झनक गुमलाडू, मपोना. नूतन कोंडे यांच्या पथकाने केली.