मुंबई, दि. १० :- ज्येष्ठ नेते, माजी खासदार संभाजीराव काकडे यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, संभाजीराव काकडे साहेब सामान्य जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी तळमळीनं कार्य करणारे नेते होते. शेतकरी, कष्टकरी, दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांच्या उन्नतीसाठी त्यांनी जीवनभर काम केले. पुणे जिल्ह्याच्या विकासात मोलाचं योगदान दिलं. राजकारण, समाजकारण, सहकार अशा समाजजीवनाच्या विविध क्षेत्रात कार्य करणारं ध्येयवादी, तत्वनिष्ठ नेतृत्वं म्हणून ते कायम स्मरणात राहतील. संभाजीराव काकडे साहेब सार्वजनिक जीवनात ‘लाला’ नावाने परिचित होते. त्यांचं निधन ही पुणे जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी आहे. जिल्ह्यानं ज्येष्ठ, मार्गदर्शक नेतृत्वं गमावलं आहे. मी, पवार कुटुंबिय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काकडे कुटुंबियांच्या आणि कार्यकर्त्यांच्या दु:खात सहभागी आहोत. स्वर्गीय संभाजीराव काकडे साहेबांना सद्गती लाभो, अशी प्रार्थनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात केली आहे.
*माजी खासदार संभाजीराव काकडे यांना* *उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रध्दांजली*
Share this:
-
Previous
सर्वोच्च न्यायालय व देशाच्या पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकाच व्हिटॅमिन घेऊन अजून जवाबदारीने काम करणार्यांची गरज आहे; कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांचे प्रतिपादन* *शिवसेना पुणे शहराच्या वतिने सुरू केलेले कोविड केअर सेंटर पुणेकरांच्या सेवेत रुजू* *राज्यभरात सरकारला समांतर असे शिव सैनिकांचे काम- खा. संजय राऊत