कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या वतीने पुणे शहरातील विविध ठिकाणी क्रस्ना डायग्नोस्टिक संस्थेमार्फत आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. यांच्यावतीने प्रभाग क्रमांक २९ड मधील सानेगुरुजी वसाहत, अंबिल ओढा, लोकमान्य नगर परिसरातील ज्येष्ठ नागरिकांची कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी पुणे महापालिका सभागृह नेते धनंजय घाटे, कृष्णा डायग्नोस्टिक संस्थेचे कर्मचारी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.
प्रभाग २९ड परिसरात आरोग्य तपासणी- नगरसेवक धनंजय घाटे.
Share this: