पीपीसी न्यूज :अजय जाधव!
शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत पन्नास पेक्षा अधिक घर फोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास नुकतेच जेरबंद करण्यात आले. गुन्हेगाराकडून १७,०७,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.२३६.५३ ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच २१२ ग्रॅम चांदीचे दागिने आणि घरफोडी करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य पोलिसांनी हस्तगत केला.
सविस्तर माहिती अशी ४ फेब्रुवारी रोजी शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये उपनिरीक्षक अजय बडे हे तपास पथकासह पेट्रोलिंग करत असताना सचिन जाधव यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत खबर मिळाली. घरफोडी मध्ये सहभागी असलेला आरोपी हा म्हसोबा गेट बस स्टॉप शिवाजीनगर येथे थांबलेला असून त्याने ठिकठिकाणी चोरी तसेच घरफोडी सारखे गंभीर गुन्हे केले आहेत. सदर बातमी शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांना कळविले असता विषयाचे गांभीर्य ओळखून सावंत यांनी नियोजनबद्ध रीतीने म्हसोबा गेट परिसरामध्ये सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. हर्षद गुलाब पवार, वय ३१,रा. घोटावडे फाटा मुळशी, जिल्हा ,पुणे या आरोपीस अटक करण्यात आली.
आरोपीची झाडझडती घेतल्यावर त्याच्याकडे असलेले सॅक मध्ये सोन्या चांदीचे दागिने आढळून आले. तसेच बऱ्याच ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली आरोपींनी दिली. पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस हद्दीतील विविध पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर अनेक दखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त मा. आमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक प्रवीण कुमार पाटील, पोलीस उपायुक्त परी १ संदीप सिंह गिल, सहाय्यक पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग साईनाथ ठोंबरे, यांच्या मार्गदर्शनाखाली. शिवाजीनगर पो, स्टे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) चंद्रकांत सूर्यवंशी, सहा. पोलीस निरीक्षक संजय पांढरे, पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, तसेच पोह. महावीर बलटे, पोना. सचिन जाधव, पोशी कृष्ण सांगवे, यांनी केलेली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अजित बडे करत आहे.





















































