पिंपरी चिंचवड मधील पिंपळे गुरव येथील काटेपुरम चौकात जोरदार वाऱ्यासह पावसाने मध्यरात्रीपासूनच हजेरी लावली. जोरदार वाऱ्यासह पडणाऱ्या पावसामुळे काटेपुरम चौकातील पिंपळे गुरव येथे दोन झाडं पडली. झाड काटेपुरम चौकातील पीएमपीएल बस थांब्यावर पडल्यामुळे बस बस थांब याचा चेंदामेंदा झाला. तसेच बस थांबा समोर लावलेल्या रिक्षाही चक्काचूर झाली. नागरिकांनी वेळीच तेथून पलायन केल्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही.