कोरोनाच्या जागतिक महामारीचा मोठा फटका पुणे शहरासह उपनगरांना बसला आहे. मुंबई नंतर सर्वात अधिक कोरोनाचे रुग्ण पुण्यात सापडत आहेत . भितीमुळे अनेक राजकीय लोक, लोकप्रतिनिधी घराबाहेर पडण्याचे टाळत आहे. असे असताना नगरसेवक अँड. प्रसन्न जगताप सिंहगडरोडकरांचे तारणहार बनले आहेत. कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्या पासून नगरसेवक अँड. प्रसन्न जगताप हे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सँनेटाईजर, मास्कचे वाटप, जनजागृती, संचारबंदीमुळे हालाखीला तोंड देत असलेल्या कष्टकरी मजूर ,निराधार,गरजूंना ते गेल्या दोन महिन्या पासून स्व:खर्चाने अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत आहेत. अहोरात्र झटणाऱ्या पोलीस, आरोग्य, सफाई कामगारापासून प्रशासनाच्या मदतीला धावून जात आहे. मानवतेचा राष्ट्रधर्म जागवून उपेक्षित, वंचितांसह सर्व नागरिकांना, प्रशासनाला बळ देत आहे. आसपास कोरोनाचा मोठा फैलाव सुरू असताना नगरसेवक अँड. प्रसन्नदादा जगताप यांच्या प्रभागात प्रशासनाला कोरोनाचा फैलाव रोखण्यात मोठे यश आले आहे. यात अँड. प्रसन्नदादा जगताप यांचे मोलाचे योगदान आहे. सिंहगडरोडकरांचे ग्रेट कोरोना वाँरियर म्हणून नगरसेवक अँड. प्रसन्नदादा जगताप यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे.
प्रशासन, पोलिस, सर्व करोना योध्दे व नागरिकांच्या मदतीसाठी अँड. प्रसन्नदादा जगताप हे अहोरात्र सज्ज आहेत. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी वेळीच उपाययोजना करण्यासाठी ते प्रशासनाला मोलाचे योगदान देत आहेत.
दोन महिन्या मार्च रोजी पुण्यात पहिला कोरोनाचा रुग्ण सिंहगडरोडवर सापडला. त्यामुळे या परिसरात कोरोनाचा उद्रेक होण्याची भिती निर्माण झाली. अशा कठीण प्रसंगी नगरसेवक अँड. प्रसन्नदादा जगताप हे प्रशासनाच्या, ग्रामस्थांच्या मदतीला धाऊन आले. परिसरात साथीचा फैलाव होऊन नये यासाठी त्यांनी धावपळ केली. घरात न बसता सोसायट्यां, वस्त्यांत जाऊन त्यांनी जनजागृती करत सर्वस्व पणाला लावले. सुरुवातीचे सर्व १३ कोरोना बाधित बरे होऊन घरी आले त्यावेळी अँड. प्रसन्नदादा जगताप यांनी प्रशासनाला सलाम केला.
कमी रुग्ण संख्येमुळे सिंहगडरोड परिसर आँरेंज झोन मध्ये आहे. असे असतानाच गेल्या दोन आठवड्या पासून परिसरात रुग्णांची संख्या वाढू लागली. त्यामुळे साथीचा फैलाव रोखण्यासाठी नगरसेवक अँड. प्रसन्नदादा जगताप हे योध्द्या प्रमाणे जनजागृती करत आहेत. उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रशासनाला सहकार्य करत आहेत. कोरोना चाचणी करण्यापासून उपचार, रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी अहोरात्र धावपळ करत आहेत.
कोरोनाच्या
भितीने भयभीत झालेल्या नागरिकांना लढण्याचे बळ देण्यासाठी अँड. प्रसन्नदादा जगताप हे रामनगर, राजीवगांधीनगर, विश्रांतीनगर , महादेवनगर , खोराड वस्ती पासून आनंदनगर, सनसनाटी, हिंगणे विठ्लवाडी ,वडगाव बुद्रुक पर्यंत जनजागृती करत आहेत.
नगरसेवक अँड. प्रसन्नदादा जगताप यांच्या योगदानाचे महापालिका, पोलीस प्रशासनाने कौतुक केले आहे. अँड. प्रसन्नदादा जगताप यांच्या रुपाने कठीण प्रसंगी प्रशासनाला, नागरिकांना ग्रेट कोरोना वाँरियर मिळाला आहे.
गोर गरीब कष्टकरी , मजूर , वयोवृद्ध, रुग्णांना वेळेवर मदत, उपचार मिळावेत यासाठी ते स्वतः गाडी चालवत , प्राणाची बाजी लावून गेल्या दोन महिन्यां पासून राबत आहेत. आदीवासी, दिव्यांग , निराधार , विधवा , परप्रांतिय मजूर आदींना मदत करत आहेत. प्रशासनाच्या मदतीला धावून जात आहेत. पोलीस , आरोग्य, महसूल, बालवाडी सेविका , कर्मचारी आदींना ते मोलाची मदत करत आहेत.
सिंहगडरोडकरांचे शिलेदार होऊन ते अहोरात्र धावपळ करत आहेत. गरजूनां जीवनावश्यक वस्तू , अन्नधान्य घरपोच देणे, कोणी उपाशी राहू नये, रुग्णांना वेळेवर औषधोपचार मिळावा यासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतले आहे.
शिवकाळापासून राष्ट्रसेवेचा वारसा : नगरसेवक अँड. प्रसन्नदादा जगताप यांच्या घराण्याला शिवकाळापासून राष्ट्रसेवेचा वारसा लाभला आहे. त्यांचे पूर्वज छत्रपती शिवरायांच्या मावळ सैन्यात होते. अँड. प्रसन्नदादा जगताप यांचे आजोबा कै.कोंडिबा जगताप पाटील यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढा दिला. त्यांचे वडील हिंगणे खुर्द चे माजी सरपंच मा. घनश्याम जगताप यांनी साथीचे रोग, पानशेत धरणफुटी, दुष्काळ आदी आणिबाणीच्या प्रसंगी परिसरातील नागरिक तसेच बाहेरगावाहून आलेल्या दुष्काळी मजूर कुटूंबाना आधार दिला. अँड. प्रसन्नदादा जगताप हे
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांने प्रभावित होऊन कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रबोधनातून जनजागृती करत आहेत. स्व:खर्चाने गरजूंना मदत करत आहेत. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी ते
जनतेला निर्भय जीवनाचा मार्ग दाखवतात.
नगरसेवक अँड. प्रसन्नदादा जगताप म्हणाले …
छत्रपती शिवरायांचा ऐतिहासिक वारसा सिंहगडरोड, पुण्यात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील गोरगरीबांची, बेरोजगार तरुण, उपेक्षितांची परिस्थिती पाहून डोळ्यात अश्रू येतात. लोकप्रतिनिधी असलो तरी हा जन्म पुन्हा नाही. या भावनेतून मदत करत आहे. कोरोनाच्या जागतिक महामारी च्या संकटात प्रत्येकाने स्वंयशिस्त पाळावी.गरजूंना मदत करावी. अहोरात्र झटणाऱ्या प्रशासनाला सहकार्य करावे.
कधीही काहीही वाटले – लागले तर या हक्काच्या माणसाला हक्काने संपर्क करा.
अँड. प्रसन्नदादा जगताप
मा. उपमहापौर व विद्यमान नगरसेवक, सिंहगडरोड परिसर
पुणे. संपर्क – ९८२२०२२९५०