पुणे : सुरेंद्र पठारे फाऊंडेशन कडून नागरिकांना विविध मोफत सुविधा देण्यात येत आहेत. यासाठी नागरिकांना टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा लागतो. याच टोल फ्री क्रमांकावर खराडीतील एका शाळेतून विद्यार्थ्यांचे तापमान मोजण्यासाठी टेम्परेचर गन हवी असल्याची मागणी आली. त्यानंतर फाऊंडेशकडून खराडीतील शाळांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार आवश्यक कोरोना प्रतिबंध साहित्यांचे वाटप करण्यात आले.
राजाराम भिकू पठारे प्राथमिक विद्यालय खराडी, तुकाराम धोंडिबा पठारे माध्यमिक विद्यालय, इऑन ज्ञानंकुर इंग्लिश मीडियम स्कूल, गणपतराव गोविंद थिटे प्राथमिक विद्यालय, सारथी माध्यमिक विद्यालय, विकास प्राथमिक शाळा, हंबीरराव कृष्णनाथ मोझे प्राथमिक विद्यालय, श्री संत तुकाराम माध्यमिक, जनरल अरुणकुमार वैद्य प्राथमिक विद्यालय, या शाळांना टेम्परेचर गन, सॅनिटायझर आणि सॅनिटायझर स्टँड या साहित्याचे वाटप फाऊंडेशन’चे अध्यक्ष सुरेंद्र पठारे यांच्या हस्ते करण्यात आले.
कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यावर पुन्हा शाळा सुरू होत असताना विद्यार्थ्यांना भयमुक्त व सुरक्षित वातावरणात शिक्षण घेता येणे महत्वाचे आहे. तसेच शिक्षकांना व संबंधित शालेय यंत्रणांना शिकवण्याव्यतिरिक्त इतर व्यापात गुंतावे लागू नये या विचारातून या कोरोना प्रतिबंध किट वाटप उपक्रम राबविला जात आहे. यामुळे शाळांना पुन्हा पहिल्यासारखे शिक्षण सुरू करता येईल अशी अपेक्षा आहे.
– सुरेंद्र पठारे, अध्यक्ष सुरेंद्र पठारे फाऊंडेशन.