पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी (तीन) विद्युत विभागाचे सहशहर अभियंता प्रवीण तुपे यांची निवड झाली आहे.
त्यांच्याकडे क्रीडा, सुरक्षा, कामगार कल्याण, कार्यशाळा, अभिलेख, माहिती व जनसंपर्क, मोरवाडी व कासारवाडी आयटीआय या विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तुपे हे पदवीधर नसून डिप्लोमाधारक आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबत महापालिकेत वादग्रस्त हालचाली सुरु होत्या. अखेर त्यांनीच बाजी मारली आहे.
अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील (एक) व अजित पवार (दोन) यांच्याकडे असलेले विभाग कमी करण्यात आले आहेत. पाटील यांच्याकडे स्थापत्य मुख्यालय, स्थापत्य (उद्यान), प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मंडळ, वैद्यकीय विभाग, वायसीएम रुग्णालय, विद्युत मुख्य कार्यालय, झोनिपु (स्थापत्य), आपत्ती व्यवस्थापन, नागरवस्ती विकास योजना, उद्यान व वृक्षसंवर्धन, स्थापत्य प्रकल्प, बीएसयुपी, ईएब्ल्यूएस प्रकल्प, बीआरटीएस या विभागाची जबाबदारी आहे.
तर, अजित पवार यांच्याकडे आरोग्य, निवडणूक व जनगणना, पशुवैद्यकीय, कर संकलन, आकाशचिन्ह व परवाना, एलबीटी, मध्यवर्ती भांडार, अतिक्रमण, भूमि व जिंदगी, सार्वजनिक वाचनालय व प्रेक्षागृह, सभा शाखा या विभागाची जबाबदारी आहे.