निगडी: प्रतिनिधी,
(ppcnews.in)
निगडी येथील साईनाथ नगर ह्या ठिकाणी पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण ह्यांनी सन १९७२/१९८४/१९८६ साली मुळ शेतकरी बांधव ह्यांच्या जमीन भूखंड संपादित केलेल्या होत्या .मुळ शेतकरी बांधव ह्यांनी जमीन भूखंड पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण ह्यांच्या ताब्यात दिला नाही .कालांतराने नंतर जमीन भूखंड पिंपरी चिंचवड शहरातील कामगार वर्ग ह्यांना खरेदी खत करून जमीन भूखंड खरेदी विक्री व्यवहार करण्यात आले .त्या वेळी मुळ शेतकरी बांधव ह्यांच्या ताब्यात जमीन भूखंड असल्याने सातबारा नोंद मुळ शेतकरी बांधव ह्यांच्या नावाने होता.

त्यामुळे कामगार वर्ग ह्यांनी उदरनिर्वाह करण्यासाठी तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत आपले स्वतःचे हक्काचे घर असावे म्हणून पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण संपादित जमीन भूखंड साठेखत करून खरेदी विक्री व्यवहार केले असून आजतागायत मुळ शेतकरी बांधव ह्यांच्या नावाने जमीन भूखंड सातबारा उतारा मिळत होतं, नवीन साठेखत करून जमीन भूखंड खरेदी विक्री व्यवहार बंदी घालण्यात आली असून सुद्धा त्या ठिकाणी साठेखत करून जमीन भूखंड खरेदी विक्री व्यवहार सुरू आहेत.

त्या ठिकाणी साईनाथ नगर येथील बेकायदेशीर बांधकाम करण्यात आले म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिका बांधकाम परवाना विभाग अधिकारी ह्यांनी नोटीस बजावण्यात आली अआहे. त्या मुळे नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे.त्या संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह व पुणे जिल्हाधिकारी साहेब ह्यांनी ताबडतोब दखल घेऊन निगडी येथील साईनाथ नगर येथील बेकायदेशीर बांधकाम नियमित करण्यात यावी.तसेच ज्या वेळी पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण ह्यांनी जमीन भूखंड मुळ शेतकरी बांधव ह्यांच्या कडून जमीन संपादित करण्यात आली होती त्या वेळी पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण ह्यांनी जमीन भूखंड ताब्यात घेतली नाही .तरी मुळ शेतकरी बांधव ह्यांनी जमीन भूखंड खरेदी विक्री व्यवहार बंदी घालण्यात आली असून सुद्धा या भूखडावर व्यवहार करण्यात आले आहे.त्या भूखंडावर कामगार वर्गानी बांधकाम करून घरे बांधली होती. यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी आथिर्क रक्कम घेऊन बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी पाठबळ दिले होते. त्याच दरम्यान महानगरपालिकेने वेगळी भूमिका घेतली असती तर ही वेळ मनपावर आली नसती.आता पिंपरी चिंचवड महानगरपालिका बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी कारवाईचा बडगा उगारला आहे.व नागरिकांना वेठीस धरण्याचे काम चालू आहे. त्या संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह ह्यांनी ताबडतोब दखल घेऊन संबंधित बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी कारवाई स्थगिती देण्यात यावी .तसेच साईनाथ नगर येथील बेकायदेशीर बांधकाम नियमित करण्यात यावे जेणेकरून नागरिकांना दिलासा मिळेल हि अपेक्षा सचिन काळभोर भारतीय जनता पार्टी चिटणीस पिंपरी चिंचवड शहर यांनी व्यक्त केली.





















































