*जागतिक युवा कौशल्य दिन यशस्वी संस्थेतर्फे उत्साहात साजरा.*
*पुणे,(ppcnews.in)दिनांक 15 जुलै 2025 :* युवा पिढीने उद्योजकतेची कास धरावी, असे मत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे पुणे विभागाचे वरिष्ठ अधिकारी डॉ.अभिराम डबीर यांनी व्यक्त केले. यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स संस्थेच्या आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास केंद्र तर्फे आयोजित जागतिक युवा कौशल्य दिनाच्या कार्यक्रमात ते पुण्यात बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, युवकांनी आधी स्वतःचे कार्य कर्तृत्व दाखवून स्वतःला सिद्ध करावे आणि मगच भरघोस यशाची अपेक्षा करावी तरच भविष्यात यशस्वी होऊ शकता. तसेच महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राने या आधी सुद्धा यशस्वी संस्थेच्या वतीने उद्योजकता विकास कार्यक्रम राबवलेला असून भविष्यातही महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र युवा पिढीतून उद्योजक घडविण्यासाठी यशस्वी संस्थेसोबत एकत्रित रित्या कार्यरत राहील अशी ग्वाही डबीर यांनी यावेळी बोलताना दिली. या कार्यक्रमाला महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार आणि उद्योजकता विकास विभागाच्या पुणे जिल्हा मार्गदर्शन अधिकारी रामेश्वरी पालवे, महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड चे समन्वयक गणेश कटारे उपस्थित होते.

याप्रसंगी विविध कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींचे प्रातिनिधिक स्वरूपात स्वागत करण्यात आले. तसेच कौशल्य अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. यावेळी कौशल्य प्रशिक्षण घेऊन स्वयंरोजगार सुरू केलेल्या विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशस्वी संस्थेच्या संचालिका स्मिता धुमाळ यांनी केले.सूत्रसंचालन ईशा फाटक यांनी तर आभार प्रदर्शन हिना शेख यांनी केले. या कार्यक्रमासाठी शुभांगी कांबळे गणेश साळवे आदींनी विशेष सहकार्य केले.

(जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त यशस्वी संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास केंद्र येथे आयोजित कार्यक्रमात कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करताना महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे वरिष्ठ पदाधिकारी डॉ.अभिराम डबीर यावेळी व्यासपीठावर त्यांच्या समवेत डावीकडून महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड चे समन्वयक गणेश कटारे महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या मार्गदर्शन अधिकारी रामेश्वरी पालवे यशस्वी संस्थेच्या संचालिका स्मिता धुमाळ व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे अधिकारी श्री शेळके सर)

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्ताने यशस्वी संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय कौशल विकास केंद्र येथे आयोजित कार्यक्रमात कौशल्य प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या विद्यार्थिनींना प्रमाणपत्र प्रदान करताना महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार व उद्योजकता विभागाचा मार्गदर्शन अधिकारी रामेश्वरी पालवे यावेळी त्यांच्या समवेत व्यासपीठावर उभे असलेले डावीकडून महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड चे समन्वयक गणेश कटारे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे वरिष्ठ पदाधिकारी डॉ. अभिराम डबीर यशस्वी संस्थेच्या संचालिका स्मिता धुमाळ व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे पदाधिकारी श्री शेळके सर

(जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्ताने यशस्वी संस्थेच्या आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास केंद्रात आयोजित कार्यक्रमात कौशल्य प्रशिक्षकांसमवेत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे वरिष्ठ पदाधिकारी डॉ.अभिराम डबीर महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड चे समन्वयक गणेश कटारे महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार व उद्योजकता विभागाच्या मार्गदर्शन अधिकारी रामेश्वर पालवे यशस्वी संस्थेच्या संचालिका स्मिता धुमाळ व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे पदाधिकारी श्री शेळके सर.)





















































