महर्षी वाल्मिकी जयंती निमित्त पिंपरी येथील सचिन सौदाई युवा मंच यांच्या वतीने सामाजिक उपक्रमाचे आयोजन
पिंपरी चिंचवड (ppcnews.in):
पिंपरी चिंचवड शहरात महर्षि वाल्मीक यांच्या जयंती निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते , युवा नेते सचिन सौदाई युवा मंचाचे पदाधिकारी व सहकारी मित्रपरिवार यांच्या वतीने (दि.8)सकाळी 11 वाजता पिंपरी येथील सावली निवारा वृद्धाश्रमात महर्षि वाल्मिकी यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून त्या ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या वृद्ध व्यक्तींना सचिन सौदाई युवा मंच यांच्या वतीने पाणी बॉटल, केळी, सफरचंद व अन्य खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले.

सदर कार्यक्रमात वृद्धांची सेवा करण्यासाठी सचिन भाई सोदाई,राजू परदेशीं , कृष्णा चटोले , गायनचंद बैद ,दीपक बैद ,अनिल पिव्हाल ,प्रेम करोतिया , विजय सोदे ,सागर खेरारिया ,अक्षय वाल्मिकी ,सुशील टाक ,रोहित परदेशी ,दादू परदेशीं, यांच्यासह मोठ्या संख्येने सचिन सौदाई युवा मंच यांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पत्रकार संतोष गोतावळे, महावीर जाधव, सिद्धांत चौधरी, हनुमंत रामदासी, नरेश जीनवाल यांचा सन्मान करण्यात आला.
सदर कार्यक्रमादरम्यान रियल लाईफ रियल पीपल संचालित सावली निवारा केंद्र मध्ये महर्षी वाल्मिकी जयंती साजरी केल्याबद्दल संस्थापक अध्यक्ष एम.एच.हुसेन यांनी सचिन सौदाई युवा मंच यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करून त्यांच्या माध्यमातून वयोवृद्धांची सेवा व असेच अनेक सामाजिक उपक्रम घडो असे मत व्यक्त करत सर्वांच्या आभार मानले.





















































