पिपीसी न्यूज नेटवर्क
वाकड: प्रतिनिधी,
यंदाच्या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्र. २६ मध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय मतदार करून दाखवणार तील. तात्पुरत्या अमिषाला आणि भुलथापांना नागरिक बळी पडणार नसून कायमस्वरूपी व ठोस विकासासाठी पाठिशी उभा राहतील, असा विश्वास आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष व उमेदवार रविराज काळे यांनी व्यक्त केला.

महापालिकेच्या प्रभाग क्र. २६ मधील पिंपळे निलख, विशाल नगर आणि कस्पटे वस्ती या परिसरातील मतदारांपर्यंत भेटी-गाठींच्या माध्यमातून आम आदमी पक्षाचे उमेदवार रविराज काळे पोहोचत आहेत. मतदारांना विकासासाठी आणि लोकाभिमुक प्रशासनासाठी पाठिशी उभा राहण्यासाठी साद घालत आहेत. त्यांना प्रभागात सर्वच ठिकाणी महिला, ज्येष्ठ नागरिकांचे आशिर्वाद आणि तरुणांची साथ मिळत आहे.
रविराज काळे म्हणाले की, “यंदा मत देताना नागरिक अधिक विचारपूर्वक, समजूतदारपणे आणि भविष्यासाठी योग्य ठरेल, असा निर्णय घेणार असल्याचे नागरिकांनी ठरविलेले आहे. आम्हाला दिखाऊ प्रचार नको, आम्हाला काम करणारे आणि दूरदृष्टी असणारे नेतृत्व हवे आहे. स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, नागरी सुविधा आणि नागरिकांच्या समस्यांच्या बाबतीत सातत्याने नागरिकांच्या मदतीला आपच्या माध्यमातून मी गेलो. कामातून विश्वास निर्माण केला आहे. त्यामुळे प्रभागाच्या भविष्यासाठी हा निर्णय घेणार असून धनशक्तीपेक्षा जनशक्तीचा विजय होईल, अशी खात्री नागरिक देत आहेत”.





















































