पुणे प्रतिनिधी,
मराठी भाषा दिनानिमित्त कलाकार कट्टा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर्फे ‘मी मराठी – स्वाक्षरी मराठी’ ही मराठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमाला मान्यवर व नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मराठी भाषेचा अभिमान जपण्यासाठी आणि मराठीचा वापर वाढवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात अनेकांनी सहभाग नोंदवत स्वाक्षरी करून मराठी भाषेबद्दलची आपली निष्ठा व्यक्त केली. कार्यक्रमस्थळी मराठी भाषेच्या संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली.

या उपक्रमाचे आयोजन छत्रपती शिवाजी नगर मनसे शाखा अध्यक्ष उदय गडकरी तसेच कोथरूड शाखा अध्यक्ष तन्मय मेमाणे यांनी केले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
या उपक्रमाबद्दल आयोजकांनी सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे व नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले.



















































