कोरोना व्हायरसनं संपुर्ण देशात थैमान घातलं आहे. कोरोनाचा कहर सुरूच आहे. दिल्ली, मुंबईसह देशातील काही ठिकाणी कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. दरम्यान, पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळं 13 जणांचा बळी गेला असून तब्बल 531 नवे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोनामुळं पुण्यात आतापर्यंत तब्बल 558 जणांचा मृत्यू झाला आहे.
पुणे शहरातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या आता 14185 वर जाऊन पोहचली आहे. दरम्यान, सद्यस्थितीत शहरात 5325 रूग्ण हे अॅक्टीव्ह आहेत. समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 8302 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज आढळून आलेल्या 531 पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये ससूनमधील 11, नायडूमधील 294 आणि इतर खासगी रूग्णालयातील 226 रूग्णांचा समावेश आहे. अॅक्टीव्ह असलेल्या 5325 रूग्णांपैकी 316 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. त्यापैकी 63 रूग्ण हे व्हेंटिलेटरवरून उपचार घेत आहेत. पुणे शहरात शहरात सलग दुसर्या दिवशी 500 हून जास्त रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याने पुणेकरांची चिंता वाढली आहे. पुण्यात आतापर्यंत 558 जणांचा कोरोनामुळं बळी गेला आहे. दरम्यान, दिवसभरात 202 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
गेल्या 4 दिवसांमधील पुणे शहरातील आकडेवारी
दि. 24 जून – मृत्यू (17) आणि पॉझिटिव्ह रूग्ण (501)
दि. 23 जून – मृत्यू (10) आणि पॉझिटिव्ह रूग्ण (467)
दि. 22 जून – मृत्यू (8) आणि पॉझिटिव्ह रूग्ण (212)
दि. 21 जून – म्हणून (6) आणि पॉझिटिव्ह रूग्ण (620)





















































