पुणे सिंहगड रोडवरील हिंगणे खुर्द परिसरातील श्री. क्षेत्र विठ्ठलवाडी श्री. विठ्ठल मंदिर बुधवार दि.१ जुलै रोजी आषाढी एकादशीला बंद ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा आदेश काढण्यात आला असून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तसेच, दरवर्षी भरणारी यात्रा यंदाच्या वर्षी रद्द करण्यात आलेली आहे.






















































