पुणे : दलित स्वयंसेवक संघ व अण्णा भाऊ साठे स्मारक संस्था पुणे यांच्या वतीने निवृत्त न्यायाधीश अॅड.रतनकुमार खाशाबा भिसे यांना “महात्मा ज्योतीबा फुले पुरस्कार” प्रदान करण्यात आला.
यावेळी माजी संघप्रमुख दादासाहेब सोनवणे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. संघटनेचे संपर्क प्रमुख साहेबराव खंडाळे, सचिव सुजीत रणदिवे, आश्रू खवळे, संतोष देवकुळे, डॉ.नारायण डोलारे, संतोष ओव्हाळ आदी उपस्थित होते. ही माहिती रणदिवे यांनी दिली.