पिपीसी न्यूज; प्रतिनिधी अजय जाधव!
हिंजवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिनांक २९ नोव्हेंबर रोजी सर्वे नंबर ९९/१ उदनशाहवली दर्ग्याच्या मोकळ्या जागेत बेंगलोर मुंबई हायवे रोडच्या बाजूला बाणेर पुणे येथे कोणत्यातरी अज्ञात इसमास हत्याराने भोसकून जीवे ठार मारून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने खून करून बॉडी उदनशाहवली दर्ग्याच्या कंपाऊंड व होर्डिंग्ज चे मध्ये आडोशाला टाकून त्यावर ज्वलनशील पदार्थ ओतून मयत बॉडी पेटवून दिल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली असता अज्ञात इसमाचा शोध घेण्यास सुरुवात केली. सदर गुन्ह्यातील मयत इसम याच्या बाबतीत कोणतीही माहिती नसताना मयत इसमाच्या खिशामध्ये अर्धवट जळलेल्या चिठ्ठीतील हस्ताक्षरवरून इसमाचे नाव पत्ता मिळविण्यात पोलिसांना यश आले. मयत इसमाचे नाव संदीप पुंडलिक माईनकर (रा.घर न.१३६२ बिल्डींग नं.२०६ म्हाडा सोसायटी, संत तुकाराम नगर, पिंपरी, पुणे) असे प्राथमिक तपासात मध्ये निष्पन्न झाले. सदर बाबत हिंजवडी पो. स्टे. येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
प्राथमिक तपासामध्ये मयत इसम याच्याबद्दल माहिती संकलित केली असता सदरचा ईसमास दारूचे व्यसन असून तो कोठेही फिरतो, कोठेही खातो, कोठे राहत असल्याची माहिती मयताचे नातेवाईक व शेजाऱ्यांकडून समजली. परंतु मयत खून का करण्यात आला याची माहिती पोलिसांना मिळत नसल्याने तपास अधिक बिकट झाला होता. परंतु पोलिसांनी चिकाटी दाखवत अहोरात्र परिश्रम करत स्त्री तपासाच्या आधारे तपास सुरू ठेवला. मयती इसम हा वल्लभनगर एसटी स्टँड येथील”शिवभोजन थाळी”येथे दररोज जेवण करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सदर ठिकाणी पोलिसांनी तपास केला असता शिवभोजन थाळी येथे जेवण करण्यासाठी येणाऱ्या गिऱ्हाईक यांचे फोटो याची तपासणी केली असता दि.२३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२/४५ वाजता मयत इसमाने इथे जेवण केल्याचे निष्पन्न झाले. इथून पुढे पोलीस तपासाला वेग आला. घटनास्थळावर जाऊन ब्लूटूथ व तांत्रिक बाबींच्या आधारे पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या मिसिंग केस बाबत माहिती घेऊन त्याआधारे तपास सुरू केला असतामेहबूब दस्तगीर शेख (रा.फ्लॅट न. बी-१३, साई श्रद्धा कॉलनी, राजवाडे नगर, काळेवाडी, पुणे) हा संशयितरित्या मिसिंग असल्याचे दिसून आले. नेमका हाच धागा पकडून तपास केला असता मेहबूब शेख कर्जबाजारी झालेला असून त्याच्यावर कोट्यवधी रुपयांचे कर्ज नसल्याची व त्याला दोन बायका असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी अधिक खोलत तपास केला असता तो दिल्ली येथे असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. पोलिसांचे एक पथक दिल्ली येथे रवाना केले तेथे तो सापडला नाही. मग पोलिसांनी दिल्ली रेल्वे स्टेशन येथे पुण्याहून आलेले व पुण्याला जाणारे प्रवाशांची यादी चेक केले असता घरचा इसम त्याच्या दुसऱ्या बायको सोबत पुण्याला रवाना झाल्याचे निष्पन्न झाले. पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत सूचनेप्रमाणे पथक तयार करून दौंड रेल्वे स्टेशन येथे जाऊन आरोपीला अटक करण्यात आली. अधिक तपास केल्यानंतर निर्दयपणे केलेल्या खूनचा आरोपीने कबुली दिली.”कोट्यवधी रुपयाचे कर्ज झाल्याने देणदारांचा सासेमिरा चुकवण्यासाठी संदीप माईनकर याचा खून करून बॉडी जाळून ही बॉडी त्याची स्वतःची असल्याचा देखावा सर्वांसमोर करणार असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या गटामध्ये आणखीन कोण कोण सहभागी आहेत याबाबतचा तपास सुरू असून आरोपीस अटक करण्यात आलेली आहे. आरोपीस ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर”मी कर्जबाजारी झालेलो असून मी माझा शेवट करीत आहे, माझी बॉडी ही बाणेर भागातच मिळेल”असा मायना दिलेला स्टॅप पेपर सापडला असून बाबत अधिक तपास सुरू आहे.
सदरची कामगिरी मा. कृष्ण प्रकाश पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड शहर, मा. रामनाथ पोकळे, उप. आयुक्त गुन्हे सुधीर हिरेमठ, अप्पर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड शहर, मा. आनंद भोईटे, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त आर आर पाटील, पोलीस उप आयुक्त परी-२ पिंपरी चिंचवड शहर, मा. गणेश बिरादार त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे हिंजवडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, पो. निरीक्षक अजय जोगदंड ,सहाय्यक पोलीस पोलिस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय जोगदंड, उधव खाडे, तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक सागर काटे, पोलीस अंमलदार बंडू मारणे, किरण पवार, महेश पालवे, श्रीकांत चव्हाण, अमर राणे, सुभाष गुरव, दत्तात्रय शिंदे, झनक गुम लाडू, व गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे, अमरीश देशमुख, पोलीस अंमलदार आजिनाथ ओबासे,गोविंद चव्हाण, मोहम्मद नदाफ, प्रवीण दले,





















































